जालना गोरखपुर उद्यापासून नवीन रेल्वे- मार्ग बदलला तर वाढू शकते उत्पन्न
जालना- बुधवार दिनांक 19 पासून सुरू होत असलेल्या जालना-गोरखपूर या रेल्वेचा मार्ग बदलावा आणि भाविकांना खंडवा काशी आणि प्रयागराज या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी मदत करावी अशी मागणी उत्तर उत्तर भारतीयांकडून होत आहे.
जिल्ह्याला खासदार रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले आणि रेल्वेच्या कामांचा विकास सुरू झाला. त्याचाच एक भाग म्हणून पंधरा दिवसांपूर्वीच जालना शहरातून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या पीट लाईनच्या कामांचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्या हस्ते पार पडला. आता नवीन रेल्वे गाड्या सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. त्यातीलच एक गाडी म्हणजे उद्या बुधवार दिनांक 19 रोजी जालना- गोरखपूर छपरा ही एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर भारतीयांची त्यांच्या घराकडे जाण्यासाठी रेल्वेची मागणी होती ती आता पूर्ण होत आहे. असे असले तरी रेल्वे चा मार्ग बदलल्यामुळे ही मान्य झालेल्या मागणीचा उपयोग होईल असे चिन्ह दिसत नाहीत.
नवीन सुरू होणारी ही रेल्वे जालना औरंगाबाद मनमाड, खंडवा, बिना, कानपूर मार्गे गोरखपूरला जाणार आहे. या रेल्वेसाठी सुमारे 48 तास लागणार आहेत, आणि दरम्यानच्या रस्त्यामध्ये कोणतेही तीर्थक्षेत्र येत नसल्यामुळे आणि वेळ जास्त लागत असल्यामुळे प्रवाशांना या रेल्वेचा फायदा कमी होण्याची शक्यता भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेश प्रवक्ता अशोक मिश्रा यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या रेल्वेचा मार्ग बदलून 1630 एवढ्या कमी किलोमीटर अंतरामध्ये जास्त ठिकाण आणि कमी वेळात गोरखपुर ला जाणारी ही रेल्वे औरंगाबाद मनमाड, खंडवा, महेर, प्रयागराज, बनारस मार्गे गोरखपूरला न्यावी जेणेकरून रस्त्यात असलेल्या तीर्थक्षेत्राला, जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील वाढवून रेल्वेला फायदा होईल आणि उत्तर भारतीयांना घरी जाणे येणे सोपे होईल अशी मागणी केली जात आहे.
एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com