Jalna Districtजालना जिल्हा

घनसावंगी तहसीलवर शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

घनसावंगी- शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करून, निवेदन देऊनही शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज घनसांवगी तहसीलवर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला होता.

आजच्या या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चात सर्व युवा शेतकरी सहभागी झाले होते, आणि “युवा शेतकरी संघर्ष समितीच्या” वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. कोणालाही निमंत्रण न देता केवळ व्हाट्सअप च्या मदतीने आवाहन केल्या गेले आणि सर्व तरुण शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. तहसील समोर मोठ्या प्रमाणात युवा शेतकऱ्यांची गर्दी जमली होती.

* या आहेत त्यांच्या मागण्या* राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीप्रमाणे निधी देण्यात यावा. शेतकऱ्यांना मंजूर झालेला विमा त्वरित वाटप करण्यात यावा .ज्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा बसविली आहे ती सदोष यंत्रणा आहे. तिची आकडेवारी रद्द करण्यात यावी आणि तालुक्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. सतत पडत असलेल्या पावसामुळे पिके हाताची गेली आहेत त्यामुळे पंचनामे आणि मोजमाप करण्याच्या पलीकडे जाऊन सरसकट पीक विमा लागू करावा. आदि मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. शेतकरी वापरत असलेल्या सर्व वाहनांसह हा मोर्चा काढण्यात आला होता.

एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button