Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

…आणि प्रवास करून आलेले ते वटवृक्ष पुन्हा बहरले,कसे? – सांगत आहेत उदय शिंदे

जालना -पंधरा वर्षांपूर्वी जालना ओस पडायची वेळ आली होती ,सर्वअधिकारी जाणे-येणे करीत होते, उद्योजक औरंगाबादला राहत होते, जालन्याला “खड्डेमय जालना” असं म्हणून हिणवत होते. मात्र आता परिस्थिती एकदम उलटी झाली आहे . रेल्वेची पीट लाईन, ड्रायपोर्ट ,नवीन आलेली औद्योगिक वसाहत, आणि कोविडमध्ये जालना जिल्ह्यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आणलेल्या विविध आरोग्य योजना, उद्योजकांनी भरभरून केलेली मदत सामाजिक संस्थांनी जीवाची परवा न करता रस्त्यावर उतरून रुग्णांना केलेली मदत, त्यामुळे जालन्याकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला आहे. जालना सोडून गेलेले परत तर येतच आहेत त्यांच्यासोबत कामधंदाच्या निमित्ताने इतरही लोक येत आहेत. जालन्यात विविध व्यवसाय सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. शासकीय योजनांचा भडिमार सुरू आहे. त्यामुळे सामाजिक संस्था जालन्यात येऊन विविध उपक्रम राबवत आहेत.

त्याचेच कांही भाग म्हणून कुंडलिका -सीना नदी पुनर्जीवन आणि आता पारसी टेकडीचे बदलणारे रोकडे पूर्वी एक टेकडी म्हणून परिचित असलेला हा डोंगर आता काही दिवसातच घनवन प्रकल्पाने नटलेला दिसणार आहे. समस्त महाजन ट्रस्टच्या माध्यमातून हे रूप बदलत आहे . त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम या ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई, प्रशासकीय यंत्रणेची सर्वतोपरी मदत करणारे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उद्योजक व्यावसायिकांना, जालनेकरांना एकत्र आणत कामामध्ये सहभागी करून घेत आणि केलेल्या कामाचा आढावा देणारे उद्योजक सुनील रायठ्ठा आणि या सर्व कामाची अंमलबजावणी करून नियंत्रण ठेवणारे उदय शिंदे , या प्रकल्पाचे हे चार आधारस्तंभ.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जालन्यात एक अप्रतिम प्रयोग झाला आणि तो यशस्वी ही झालेला आज दिसत आहे. हा प्रयोग म्हणजे वटवृक्षाचं पुनरुज्जीवन! कुंडलिका सीना नदीच्या स्वच्छतेनंतर जालना शहराच्या जवळच असलेल्या पारसी टेकडीकडे सर्वांचेच लक्ष लागलं! रस्त्याच्या कामासाठी तोडल्या जाणारा एक वटवृक्ष वाहून आणला आणि या उंच डोंगरावर म्हणजेच पारसी टेकडीवर त्याचं पुनर्रोपण केलं, अशा दोन वटवृक्षांना आज इथे पालवी फुटलेली आहे .सुमारे सुमारे 40 वर्षांपूर्वीचे हे वटवृक्ष असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच वटवृक्षांच्या पुनर्जीवनाची ही यशोगाथा. एवढं करूनच हा चमू थांबलेला नाही ,तर भविष्यात झाडे तोडण्यास परवानगी देण्यापूर्वी त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करून पुन्हा लावण्याची अट घालावी जेणेकरून पुन्हा एक झाड जशास तसे तयार होईल, त्यासोबत अशा झाडांच्या वाहतुकीसाठी लागणारे साहित्य आणि , मनुष्यबळ पुरविण्याचा एक नवीन व्यवसाय व्यवसाय सुरू करावा असे आवाहनही उद्योजक सुनील रायठ्ठा यांनी केले आहे. पारसी टेकडीवर लावण्यात आलेल्या दोन वटवृक्षांचा तोडण्यापासून ते पालवी पुलण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला व्हिडीओ मध्ये सांगत आहेत उदय शिंदे.

एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button