Jalna Districtजालना जिल्हा

जिल्ह्यातील अनेक महाविद्यालय होतील आता बंद!

जालना- शैक्षणिक वर्ष 23- 24 पासून नवीन शैक्षणिक धोरण राबविले जाणार आहे, आणि यामध्ये नॅक मूल्यांकन आवश्यक आहे. त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली होती आणि विनाअनुदानित क्षेत्रातील जालना जिल्ह्यातील विंद्याचल शिक्षण संस्थेचे (व्ही. एस. एस.) शिक्षण संस्थेचे हे जालन्यातील एकमेव महाविद्यालय पात्र ठरले आहे,अशी माहिती विंद्याचल शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. शिवाजी मदन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांच्यासोबत जे. इ. एस. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर रामलाल अग्रवाल, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अनंता मदन, प्राध्यापक सतीश कंठाळे, यांची उपस्थिती होती. मूल्यांकनाविषयी माहिती देताना डॉ. मदन म्हणाले की विद्यापीठांतर्गत 464 महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 167 महाविद्यालय या मूल्यांकनामध्ये पास झाली आहेत .जालना जिल्ह्यामध्ये एकूण 76 महाविद्यालयांनी या मूल्यांकनासाठी नोंदणी केली होती त्यापैकी 59 महाविद्यालय हे विनाअनुदानित आहेत आणि या 59 विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी व्ही. एस. एस. महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे ज्याला विनाअनुदानित क्षेत्रातील मूल्यांकन मिळालेले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 76 महाविद्यालय आहेत त्यापैकी 59 विनाअनुदानित आहेत आणि 17 अनुदानित आहेत. तसेच कोणताही राजकीय वारसा किंवा राजकीय पाठिंबा नसल्याचा उल्लेख ही नॅक मूल्यांकन समितीने आपल्या अभिप्रायामध्ये दिला असल्याचेही डॉक्टर मदन यांनी सांगितले.

एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button