Jalna Districtजालना जिल्हा

पत्नी आणि मुलीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

जालना-स्वतःच्या मुलीला आणि पत्नीला भोसकून ठार मारणाऱ्या तरुणाला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे .”परतुर तालुक्यातील अकोली येथे राहणारे शहाजी गोविंदराव देशमुख(30) हे त्यांची पत्नी ज्योती 28 हिला नेहमी चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत होते. वारंवार भांडणेही होत होती. यातच दोन सप्टेंबर 2020 रोजी दोघांमध्ये भांडण झाले आणि शहाजी देशमुख यांनी त्यांच्या घरात असलेल्या लोखंडी भाल्याने पत्नी ज्योती आणि सात वर्षाची मुलगी ऋतुजा या दोघांना भोसकले यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. त्यानंतर ज्योतीचा भाऊ नागेश सोळंके याने आष्टी येथे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि या तक्रारीच्या अनुषंगाने भादवि कलम 302 नुसार शहाजी देशमुख यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. सानप यांनी केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.त्यानुसार न्यायाधीश ए. एल. टिकले यांनी आठ साक्षीदार तपासले आणि दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आरोपी शहाजी गोविंदराव देशमुख यांनी खून केल्याचे निष्पन्न झाल्यावर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक तथा अतिरिक्त सरकारी वकील जयश्री सोळंके (बोराडे) यांनी काम पाहिले.

एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button