1.
Jalna Districtजालना जिल्हा

युवा शेतकऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन मागे

घनसावंगी- युवा शेतकऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन मागे
घनसावंगी -ओला दुष्काळ जाहीर करावा आणि इतर काही मागण्यांसाठी घनसावंगी तालुक्यातील युवा शेतकऱ्यांनी काल दिनांक 18 रोजी घनसावंगी तहसीलवर बिऱ्हाड मोर्चा आयोजित केला होता. आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मागे ते मागे घेण्यात आले आहे.


घनसांवगी तालुक्यातील एकूण एक लाख 4 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. त्यापैकी फक्त 38 हजार 375 शेतकऱ्यांनीच विमा कंपनीला पूर्वसूचना केलेली आहे ,आणि त्यांच्या सूचनेनुसार 100% पाहणीही झालेली आहे. पाहणी झालेल्या या शेतकऱ्यांना दिनांक 22 तारखेपर्यंत त्यांची रक्कम खात्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न करत असल्याची ग्वाही तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी आंदोलन कर्त्यांना दिली. तसेच युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलकांच्या मागण्या पीक विमा कंपनीच्या राज्य प्रतिनिधींसोबत चर्चा करून सोडविण्यात आल्या आहेत आणि लवकरच त्यांनाही अनुदान मिळेल अशी माहिती नायब तहसीलदार गौरव खैरनार यांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे बिऱ्हाड आंदोलन आज मागे घेतले आहे.

एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button