Jalna Districtजालना जिल्हा

दिवाळीनिमित्त बालवाडीच्या विद्यार्थ्यांना कीडक्या धान्याचा” मेनू”

जालना- देशभर दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे प्रत्येकाच्या घरी गोडधोड अन्न शिजत आहे .असे असताना जालन्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये एक विशेष “मेनू” दिल्या जात आहे आणि तो म्हणजे किडलेल्या कडधान्याचा.

जालना जिल्हा परिषदेअंतर्गत वाघरुळ येथे बालवाडी चालविल्या जाते बालवाडीतील या मुलांना नुकत्याच सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. पालकांना शाळेत बोलावून नियमानुसार गहू तांदूळ तुरदाळ, तेल, मीठ, आदि साहित्याचे वाटप केले जात आहे. या साहित्यामध्ये देण्यात येणाऱ्या गहू, तूरडाळ आणि वाटाणे यांचा जर विचार केला तर गहू स्वच्छ करून किमान वापरता तरी येतील मात्र किडलेले वाटाणे आणि तूर डाळ ही दिवाळीसाठी “मेनू” म्हणून दिली की काय? असा संतप्त प्रश्न पालक विचारायला लागले आहेत. मंगळवार दिनांक 18 रोजी या बालवाडीतून विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावल्या गेले आणि त्यांना ही किट वाटप केली त्यातीलच एक पालक आहेत श्रीराम नारायण मुंडलिक. यांचा मुलगा बालवाडीत शिकत आहे त्याच्या पालकांना बोलावून जो आहार दिला त्या आहारामध्ये किडलेले वाटाणे आहेत. या वाटाण्यामधून मुंग्या आणि कीटक बाहेर निघत आहेत हीच परिस्थिती तूरडाळीची देखील आहे. गावातील सर्वच पालकांना अशा प्रकारच्या अन्नधान्याचे वाटप केल्या गेले आहे. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. प्रतिनिधी स्वरूपात मुंडलिक यांनी आज जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. दरम्यान यासंदर्भात एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी दत्ता वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता झालेल्या प्रकाराचे चौकशीचे आदेश दिले आहेत आणि उद्याच्याला या संदर्भात अहवाल मागून घेतल्या जाईल असे सांगितले आहे.

एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button