पंधरा कामगार दहा दिवस आणि पाच हजार वृक्ष लागवड; पारसी टेकडीवर घनवन प्रकल्पाची उभारणी
जालना- कुंडलिका- सीना नदीच्या पुनर्जीवनानंतर घनवन प्रकल्पाकडे वळालेले जालनेकर आता चांगले चर्चेत यायला लागले आहेत. पारसी टेकडीवर घनवन प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दहा दिवसांपासून 15 कामगार आणि पाच हजार वृक्ष लागवड करून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
समस्त महाजन ट्रस्ट, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स आणि मुंबई येथील केशव सृष्टी यांच्या सौजन्याने इथे घनवन प्रकल्प उभारल्या जात आहे. सुमारे 65 प्रजातींची विविध प्रकारची झाडे येथे लावण्यात आली आहेत. त्यांची देखभाल दुरुस्तीसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदानी मधून सौर उर्जेवर चालणाऱ्या वीज पंपाच्या माध्यमातून या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. पुढील तीन ते साडेतीन वर्षांमध्ये इथे घनदाट जंगल तयार होईल असा विश्वास केशव सृष्टीचे पदाधिकारी अश्विन साहू यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियंत्रणाखालीच मागील दहा दिवसांपासून इथे वृक्षांची लागवड झाली आहे. मुंबई येथून आलेली ही टीम सर्व काम आटोपून काल रविवारी परत गेली. त्यांना निरोप देण्यासाठी सुनीलभाई रायठ्ठा, प्रवीणभाई भानुशाली, शिवरतन मुंदडा ,उदय शिंदे, यांची यावेळी उपस्थिती होती.
पारसी टेकडीच्या पायथ्याशी विविध प्रकारच्या साडेचार हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये औषधी वनस्पती, फळांचे फुलांची झाडे,आणि ऑक्सिजन वायू पुरविणाऱ्या बांबूची ही लागवड करण्यात आली. फळाफुलांच्या झाडामुळे इथे विविध प्रकारचे पक्षी आणि फुलपाखरे येतात तर डोंगर माथ्यावर अडीचशे सीताफळाची आणि अडीचशे इतर फळांची रोपे लावण्यात आली आहेत.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com