Jalna Districtजालना जिल्हाबाल विश्व

बालकलाकारांची चैतन्यमय “दीपावली संध्या”

जालना-दीपावली म्हणजे दीपोत्सव मग तो पहाटेचा असो किंवा सायंकाळचा. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानंतर जालन्यात आणखी एक नवीन परंपरा सुरू झाली आहे ती म्हणजे “दीपावली संध्या” या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीच या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.

संध्याकाळच्या अंधारातही दीप प्रज्वलनामुळे, दिव्याच्या प्रकाशामुळे आयुष्याच्या वाटेवर ही प्रकाश टाकण्याचाच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि फाईव -जी इंटरनेटच्या जगात मुलांमध्ये आध्यात्मिक, संस्कारांचा अभाव दिसायला लागला आहे ,त्याची जागा भरून काढण्याचा,आणि पुन्हा या संस्काराचे बीजारोपण करण्याचा या कार्यक्रमातून प्रयत्न केला गेला आहे. पूर्वी सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी घराघरातून “शुभमं करोति कल्याणम” चे सूर आळवलेले ऐकायला मिळत होते .याच सुरांची आठवण बालकांनी या कार्यक्रमांमधून करून दिली आहे, नव्हे तर त्यांच्यावर काय काय संस्कार झालेत हे देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम या मुलांनीच स्वतः जमवलेल्या पैशातून उभा केला आहे. त्यांच्या या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिक जमले नसते तरच नवल.यामध्ये प्रारंभी शुभमकरुत्वम, एकदंताय,प्रभाती सूर नभी रंगती,शुभम करोति म्हणा मुलांनो,देव देव्हाऱ्यात नाही,आकाशी झेप घे रे,भय इथले संपत नाही,जब दीप,हे प्रभो विभो,झाले युवती मना,गर्द सभोवती शेवटी भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यामध्ये बालकलाकार तेजस्विनी, अमित,आराध्या,तेजल,भव्या,श्रेयस,अमोघ,कल्पेश प्रज्वल,श्रेयश जितेन, गिरीराज,वरद, तेजस,वैष्णवी कुलकर्णी निवेदन शर्वरी देशपांडे हिने केले.कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन प्रसिद्ध तबलावादक प्रसाद चौधरी डॉ.प्रभू,संकेत शार्दुल यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. देवगिरी पतसंस्थेच्या बापूसाहेब करंदीकर सभागृहात संपन्न झाला.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles