दिवाळी झाली नाही गोड; उद्यापासून जिल्ह्यातील समुदाय अधिकारी संपावर.
जालना -आरोग्य सेवेत महत्त्वाचा घटक असलेल्या समुदाय अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून कामावर आधारित दिल्या जाणारा मोबदला दिला नाही. त्यामुळे हे कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत येतात. दरम्यान दिवाळीपर्यंत मोबदला मिळेल या आशेवर त्यांनी दम धरला होता. मात्र अद्याप पर्यंतही त्यांना मोबदला न मिळाल्याने त्यांची दिवाळी कडू झाली आहे , म्हणून त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. संपामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होण्याची ही शक्यता आहे. ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण, बाळंतपण, जनजागृती, अशा विविध प्रकारची कामे डॉक्टर संवर्गातील हे समुदाय अधिकारी करतात. जिल्ह्यामध्ये 190 समुदाय अधिकारी आहेत आणि त्यांना दरमहा 25 हजार रुपये मानधन, तसेच त्यांच्या कामावर आधारित सुमारे 15000 रुपये अतिरिक्त मानधन दिल्या जाते. हे सर्व कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या मानधनाची तारीख निश्चित नसते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात यांचे सर्व कामकाज आहे. तुटकुंजा मानधना व्यतिरिक्त मिळणाऱ्या कामावर आधारित मोबडल्यावर अनेकांनी वाहने, घरे घेतली आहेत त्यांचे हप्ते देखील मानधन न मिळाल्यामुळे थकले आहेत. पर्यायाने व्याजाचा भुर्दंड ,वाहनाच्या आणि घराच्या जप्तीची टांगती तलवार कायम आहे. या प्रकाराला वैतागून त्यांनी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिवाळीपूर्वी मानधन देण्याची विनंती केली होती, मात्र ती पूर्ण न झाल्याने उद्या मंगळवार दिनांक 25 रोजी जिल्ह्यातील 190 समुदाय अधिकारी संपावर जात आहेत.
दिलीप पोहनेरकर,
9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com