Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

उड्डाण पुलावरून स्कोडा गाडी कोसळली: गाडीचा चुराडा; जीवितहानी नाही

जालना- मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान असलेल्या रेल्वेच्या उड्डाण पुलावरून रात्री स्कोडा( एम एच -21- ए डी 57 77) या कंपनीचे चार चाकी वाहन खाली कोसळले. वाहनाचा चुराडा झाला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.


सुधीर सतीश पवार 23, राहणार सतकर नगर, प्रतीक वाघमारे 26 राहणार बन्सीलाल नगर, आणि बालाजी हांडे26, राहणार जिल्हा परिषद निवासस्थान जालना .हे तिघेजण रात्री नऊ वाजेच्या सुमारास रामनगर कडून सतकर नगर येथील राहत्या घरी येत होते.सुधीर पवार हे गाडी चालवत होते. दरम्यान पुलावरून दुसऱ्या वाहनाच्या बाजूने जात असताना वाहनावरील ताबा सुटला आणि हे वाहन उड्डाणपुलाचे कठडे तोडून सुमारे 50 फूट खाली कोसळले .

रात्रीचा अंधार होता अशा परिस्थितीत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी हा अपघात पाहिला आणि मदतीसाठी धावले. पुलाच्या खाली ही अंधार असल्यामुळे मदत कार्याला मोठी अडचणीत होती. अशा परिस्थितीत नागरिकांनी त्यांना वाहनाच्या बाहेर काढले. तिघांच्याही तब्येती सुदृढ असल्यामुळे जीवित हानी झाली नाही. दरम्यान या तिघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनाचा मात्र चुराडा झाला आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button