समृद्धी शुगर्स करणार 10 लाख मेट्रिकटन उसाचे गाळप
घनसावंगी -तालुक्यातील देवी दहेगाव येथे असलेल्या समृद्धी शुगर या साखर कारखान्याचा सन 2022 23 गाळप हंगाम आज पासून सुरुवात झाला. या हंगामाची पहिली मुळी टाकण्याचा मान, सौ. भाग्यश्री लक्ष्मण ढवळे सौ. शारदा शिवाजी गाडेकर, सौ. शकुंतला गंगाधर टोळे, सौ. पार्वती दत्तात्रय तौर या महिलांना मिळाला.
या कार्यक्रमाला समृद्धी शुगर लिमिटेडचे अध्यक्ष सतीश घाडगे पाटील उपाध्यक्ष महेंद्र मेठी यांच्यासह अनेक मान्यवर व संचालकांची उपस्थिती होती.
यावेळी माहिती देताना अध्यक्ष सतीश घाडगे म्हणाले की ,”मागील वर्षी या कारखान्याची गाळपाची क्षमता दर दिवशी अडीच हजार ते 2700 मेट्रिकटन होती त्यामुळे येणारा ऊस आणि कारखान्याची क्षमता याचा ताळमेळ बसत नव्हता. म्हणून यावर्षी ही कार्यक्षमता वाढविण्यात आली आहे आणि आता दर दिवशी 5000 मॅट्रिक टन उसाचे गाळ होणार आहे. त्या अनुषंगाने सन 2022- 23 च्या गाळप हंगामामध्ये 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. तसेच परिसरातील ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे त्यांना वाऱ्यावर न सोडता मदतीचा हातही पुढे केल्या जाणार आहे. ज्या सभासदांच्या घरी शुभ कार्य आहे अशा सभासदांना एक क्विंटल साखरही मोफत दिल्या जाणार असल्याचे घाडगे पाटील यांनी सांगितले.
आम्ही फक्त आणि फक्त शेतकऱ्याचे हित जपणार आहोत आम्ही प्रत्येक सभासदांना चिखलात उभे न राहता घरपोच साखर देणार तसेच प्रत्येक सभासदांच्या मुलीच्या लग्नाला घरपोच एक क्विंटल साखर मोफत देणार तसेच प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतातला ऊस बाहेर काढण्यासाठी रस्त्याची खूप अडचण आहे त्यामुळे शेतकऱ्याचा ऊस जात नाही त्यामुळे आमचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात रस्ता करण्याचे व आम्ही ते पूर्ण करणार असे यावेळी ते म्हणाले.
दिलीप पोहनेरकर,
9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com