Jalna Districtजालना जिल्हाराज्य

श्रीरामांच्या मूर्तींचे संशयीत चोर सापडले? कर्नाटक येथून घेतले ताब्यात

जालना -घनसावंगी समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून श्रीरामांचे पंचायतन दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेलो होतो.

समर्थ रामदास स्वामी ज्या मूर्तींची पूजा करत होते अशा या अमूल्य मूर्ती होत्या. या चोरी प्रकरणी पोलिसांनी जंग- जंग पछाडले होते आणि माहिती देणाऱ्याला दोन लाखाचे बक्षीसही जाहीर केले होते. कदाचित त्याचा परिणाम दिसून येत आहे. काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयितांना कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे, आणि एक मुख्य संशयित फरार असल्याची माहिती समोर येत आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने हा तपास सुरू होता. आजही सूत्रांनी आरोपीला पकडण्याची माहिती दिलेली आहे मात्र पोलीस आताही गुप्तता बाळगून आहेत. दरम्यान पकडलेल्या संशितांकडून काही मूर्ती जप्त केल्याचेही सांगण्यात येत आहे. एकंदरीत पोलिसांचा या मूर्तींचा तपास आता पूर्णत्वाकडे जात आहे. 22 ऑगस्ट ला श्रीराम मंदिरातून या मूर्तींची चोरी झाली होती, त्यानंतर गावकऱ्यांनी अन्न त्याग उपोषण केले, तरीदेखील पोलिसांना मूर्ती चोरांचा शोध लागत नव्हता, शेवटी संत -महंत जांब येथे आले आणि आंदोलन करून 20 नोव्हेंबर पर्यंत मूर्तींचा शोध न लागल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता.

कदाचित त्याची दखल घेऊन महाराष्ट्रात पोलिसांच्या विरोधात तयार होत असलेले वातावरण पाहून पोलिसांनी हा तपास पूर्ण करण्याच्या दृष्टीने मूर्ती चोराची माहिती देण्यासाठी दोन लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. त्याचाच परिणाम म्हणून काल दोन मूर्ती चोरांना पकडले आहे. त्यांच्याकडून एक हनुमानाची मूर्तीही जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी सूत्रांनी दिली आहे.

दिलीप पोहनेरकर,
9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles