Jalna Districtजालना जिल्हाराज्य

श्रीरामांच्या मूर्तीचा तपास लागला; दोन आरोपींसह एक मूर्ती ताब्यात

जालना -सुमारे दोन महिन्यांपूर्वी घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांब येथून श्रीरामांच्या मूर्तींची चोरी झाली होती .समर्थ रामदास स्वामींनी ज्या मूर्तींची पूजा केली अशा या सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या मूर्ती होत्या. या मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोड रुपये किंमत आहे असे सांगितले जाते. दरम्यान या रुपयांच्या मूल्यापेक्षा हिंदूंच्या भावना महत्त्वाच्या आणि अनमोल आहेत असा सूर निघाला होता ,आणि ठिकठिकाणी निवेदने ,मोर्चे ,आंदोलने करण्यात आली होती .असे असतानाही मूर्तींचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांनी शेवटी दोन लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. एकंदरीत पोलीस प्रशासनावर जनतेचा वाढता दबाव लक्षात घेता पोलीस यंत्रणेची तपास चक्रे गतीने फिरवली गेली .त्याचाच परिणाम म्हणून काल दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मूर्तीसह ताब्यात घेतले आहे. एक मुख्य आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे.

यासंदर्भात आज पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग ,घनसांगी चे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन ,यांची उपस्थिती होती .या पत्रकार परिषदेतील माहिती जशी आहे तशी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा edtv news चा प्रयत्न.

 

दिलीप पोहनेरकर,
9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles