आता खऱ्या अर्थाने दिवाळी- भूषण स्वामी. समर्थांच्या चारमूर्तींसह मुख्य आरोपी शेख जीलानी पोलिसांच्या ताब्यात

जालना/ घनसावंगी- समर्थांचे जन्म ठिकाण असलेल्या श्री जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून 22 ऑगस्ट रोजी श्रीरामांच्या मूर्ती आणि पंचायतन चोरीला गेले होते. या प्रकरणातील काही मूर्ती पोलिसांना सापडल्या आहेत, आणि आणखी काही मूर्ती बाकी आहेत. या मूर्ती परत मिळविण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाईल आणि मूर्ती ताब्यात मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जांब समर्थ चे वैभव दिसायला लागेल .मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. जांब या गावाला सजवले जाईल, आणि भव्य दिव्य कार्यक्रम करून या मूर्तींची पुन्हा स्थापना करू, समर्थ भक्तांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल, अशी माहिती समर्थ रामदास स्वामींचे अकरावे वंशज भूषण स्वामी यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी काल शेख राजू शेख हुसेन राहणार कर्नाटक, हल्ली मुक्काम सांजनगर ,उस्मानाबाद आणि महादेव शिवराम चौधरी, राहणार संजयनगर वैराग ,जिल्हा सोलापूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक पंचायतन जप्त केले होते .आज हैदराबाद येथून शेख जिलानी या मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार मूर्ती जप्त केल्या आहेत.
दरम्यान काल जे पंचायतन पोलिसांना सापडले होते त्यामध्ये समर्थांच्या वडिलांना हे पंचायतन मिळाले होते. आता मिळालेल्या चार मूर्तीमध्ये कदाचित राम, लक्ष्मण, सीता, आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्ती असाव्यात. अजूनही श्रीरामांची एक मोठी मूर्ती, समर्थांच्या झोळीतील एक मारुती, समर्थांच्या दंडावरचा मारुती, आणि एक उत्सव मूर्ती अशा चार ते पाच मूर्ती बाकी आहेत .पोलिसांनी लावलेल्या या तपासाबद्दल समाधानी आहोत आणि उर्वरित मूर्ती देखील पोलीस लवकरच शोधतील अशी अपेक्षा आहे.असेही भूषण स्वामी म्हणाले. दरम्यान आज पोलीस प्रशासना सोबत चर्चा करणार असल्याचेही भूषण स्वामी म्हणाले.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com
बाळासाहेब ढेरे,घनसावंगी
9067394777,9422219172