“कानून के हाथ लंबे होते है” श्रीरामांच्या मूर्तीचा कसा लागला तपास पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांची विशेष मुलाखत
जालना -समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून 22 ऑगस्ट रोजी श्रीरामांच्या पुरातन मूर्ती चोरीला गेल्या होत्या.
पोलिसांची सर्व यंत्रणा कामाला लागली होती तसेच त्यांचे असलेले वेगवेगळे विभागही या तपासासाठी काम करत होते .मात्र चोरट्यांचा सुगावा लागत नव्हता. त्यामुळे दोन लाखाचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. हे दोन लाख देखील पिके पडले एवढ्या सीताफिने चोरट्यांनी ही चोरी केली होती आणि मागील दोन महिने पोलिसांना झुलवत ठेवले होते. शेवटी म्हणतात ना “कानून के हात लंबे होते है” अशा पद्धतीने पोलिसांनी याचा छडा लावला आहे. दोन महिन्यांपासून चोरट्यांचा मागावर असलेल्या पोलिसांना दिवाळीच्या मुहूर्तावर वनवासात गेलेले श्रीराम भेटले. यासंदर्भात जालनाचे पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी edtv news ला विशेष मुलाखत दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तपासा दरम्यान चोरीच्या काळातील आठ- दहा दिवसांमध्ये त्या भागात काय घडामोडी घडल्या? या सर्वांची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून गोळा केल्या गेली. तसेच परिसरातील सर्व पेट्रोल पंप, ढाबे यावर बसवलेल्या सीसीटीव्हींचीही माहिती संकलित करून ती बारकाईने तपासल्या गेली. परिसरातील सर्व टॉवर वरून जे कांही मोबाईल केल्या गेले होते त्यांची ही माहिती तपासली. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील जेवढे काही परराज्यात किंवा परदेशात सामानाची वाहतूक करणारे एजंट आहेत त्या सर्वांना पत्रव्यवहार करून मूर्तीचे फोटो पाठवून सतर्क करण्यात आले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय शेवटी एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला, आणि तिथून खऱ्या अर्थाने या मूर्तीच्या तपासाला वेग आला . या मूर्तींच्या तपासाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे.
दिलीप पोहनेरकर,
9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com