सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात स्फोट; सहा कामगार गंभीर जखमी
जालना -नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास लोखंड वितळण्याच्या भट्टीत झालेल्या स्फोटामध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत.
या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी अधिकृत माहिती जारी केली आहे. या माहितीनुसार औद्योगिक वसाहतीमध्ये गीताई नावाने लोखंडाच्या सळ्या तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यांमध्ये असलेल्या लोखंड वितळविण्याच्या भट्टीमध्ये आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी चार कामगारांवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठविले आहेत तर दोन कामगार गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना सुरुवातीलाच औरंगाबाद येथे पाठविले आहे. जालना शहरात रुग्णालयात भरती केलेल्या जखमींमध्ये विवेककुमार रामाभरे35, राहणार उत्तर प्रदेश ,अजिंक्य काकडे21, राहणार चंदंनजिरा जालना, माहेश्वरी अवदेश पांडे 30,राहणार बिहार. संतोष सेवालाल36 राहणार ,मिर्झापूर यांचा समावेश आहे. तर उर्वरित गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजय कुमार सिताराम राजभर वय 25, आणि प्रवीण सिंमवेस वय 22 या दोघांचा समावेश आहे. या दोघांना औरंगाबाद येथे उपचार कमी पाठविण्यात आले आहे. दरम्यान ही माहिती पोलिसांनी अधिकृत जारी केली आहे मात्र अद्याप पर्यंत कोणाचाही मृत्यू झाला असल्याचे म्हटलेले नाही .पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, यांनी या कारखान्याला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com