“त्या” आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा वकील संघाचा ठराव

जालना-जांबसमर्थ येथे समर्थांच्या देव्हाऱ्यातील मुर्ती चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात घनसावंगी वकील संघाच्यावतीने आरोपींचे कोणत्याही वकील सदस्यांनी वकीलपत्र दाखल करून धेऊ नये असा ठराव घेतला आहे. त्यामुळे आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी आरोपींच्या वतीने न्यायालयात खटला लढविण्यासाठी पर जिल्ह्यातून वकिलांना यावे लागले आहे. दरम्यान न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि बुधवार दिनांक दोन रोजी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्यावेळी. त्यावेळी कुठले वकील ही केस लढवणार आहेत ते निश्चित होईल.
दि.१ नोव्हेंबर रोजी घनसावंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस.आर.धायतडक यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणातील आरोपींच्यावतीने घनसावंगी न्यायालयातील कोणत्याही वकील सदस्यांनी आरोपींचे वकीलपत्र दाखल करू नये. अशा प्रकारचा ठराव अॅड.शामसुंदर तांगडे यांनी सूचक म्हणून मांडला होता. त्यास अॅड.गजेंद्र तांगडे यांच्यासह सर्व सदस्यांनी सर्व संमतीने पाठींबा दर्शविला. तसेच श्रीराम मंदिर देवस्थान यांच्यावतीने सदर प्रकरणात न्यायालयीन कामकाजासाठी देवस्थान समितीकडून कोणत्याही प्रकारचा खर्च न घेता स्वखर्चाने घनसावंगी वकील संघातील सर्व सन्माननीय सदस्य कामकाज करतील असाही ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला आहे. घनसावंगी वकील संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या सदरील निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. यावेळी अॅड.शामसुंदर तांगडे, अॅड.व्ही.ए. तौर, अॅड.जी. जी. तांगडे, अॅड. वागदरे, अॅड.के.आर.कुलकर्णी, अॅड.एस.जी.देवडे, अॅड.ए.के.माने, अॅड.एस.व्ही. चव्हाण आदींची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com