Jalna Districtजालना जिल्हा

1025 रुपयांसाठी शिक्षण संस्थेचे तिघेजण लाचेच्या जाळ्यात

जालना -भोकरदन तालुक्यातील धावडा येथे असलेल्या डॉ. नसीम उर्दू जुनिअर कॉलेजच्या प्राचार्यांसह संस्थाचालकाने लाच मागितल्या प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नियमापेक्षा 1025 रुपये यांनी जास्त मागितले होते .आतापर्यंत अशा प्रकारचे किती अतिरिक्त शुल्क वसूल केले असतील अशी चर्चा आता भोकरदन तालुक्यात सुरू झाली आहे .

धावडा येथे डॉ. नसीम उर्दू जुनियर कॉलेज आहे या कॉलेजमध्ये बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांची फी 475 रुपये आहे, मात्र कॉलेजच्या प्रशासनाने त्याच्याकडून दीड हजार रुपयांची मागणी केली. ही जास्तीची रक्कम देण्याची विद्यार्थ्यांची तयारी नसल्यामुळे त्याने संस्थेचे प्रभारी प्राचार्य शेख शोएब शेख मेहबूब वय 32 ,यांनाही तक्रार सांगितली, प्राचार्याने देखील दीड हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले, त्यामुळे हा विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नसीम अहमद खान इस्माईल खान व 57 यांच्याकडे गेला त्यांनी देखील दीड हजार रुपये भरावेच लागतील असे सांगितले .दरम्यान विद्यार्थ्यांची जास्त फी देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली .या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी पूर्व तपासणी केली आणि त्यामध्ये संस्था अतिरिक्त शुल्क वसूल करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार दिनांक एक नोव्हेंबर रोजी या संस्थेचा प्रयोगशाळा सहाय्यक पवन श्रीराम भोबे यांच्यामार्फत दीड हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले आहे. लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याच्या कारणावरून डॉ. नसीम अहमद खान इस्माईल खान संस्थाध्यक्ष, प्राचार्य शेख शोएब शेख महबूब आणि प्रयोगशाळा सहाय्यक पवन भोबे या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस निरीक्षक एस. एम. शेख, ज्ञानदेव झुंबड, गणेश शेळके, शिवाजी जमधडे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles