त्यांनी तोडले आम्ही जोडणार -भारत जोडो यात्रा सात तारखेला महाराष्ट्र
जालना-मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी देश तोडण्याचे काम केले आहे ,मात्र राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढून देश जोडायला सुरुवात केली आहे. ही पदयात्रा दिनांक सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे येत असून 20 तारखेपर्यंत ती महाराष्ट्रात राहणार आहे. नांदेड नंतर शेगाव येथे देखील भव्य सभा होणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार नामदेव पवार यांनी दिली. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महमूद आदि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती .
पुढे बोलताना श्री. पवार म्हणाले की देगलूर येथे ही यात्रा प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर नांदेड येथे सभा झाल्यानंतर ती शेगाव कडे निघणार आहे. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेचा होणार आहे .या यात्रेत सामील होण्यासाठी जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना वाशिम येथे बोलावण्यात आले असून सुमारे 5000 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्याच सोबत महाराष्ट्रात पदार्पण झाल्यानंतर देखील अनेक कार्यकर्ते या यात्रेसोबत राहणार आहेत.
दरम्यान भारत जोडण्याचे कारणच काय? या प्रश्नाला उत्तर देताना श्री. पवार म्हणाले की, ज्यावेळेस पासून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे त्यावेळेस पासून विचारांचे प्रदूषण वाढले आहे. जातीयतेचे विष पेरल्या जात आहे ,आणि हळूहळू देश तुटायला लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहेत . म्हणूनच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत असल्याचेही ते म्हणाले .या संदर्भातील पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात आज बैठकही पार पडल्याची त्यांनी सांगितले.********
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com