Jalna Districtजालना जिल्हा

काँग्रेसच्या दीपावली स्नेह मिलनात शिवसेनेचा ठाकरे गट टार्गेट

जालना-काँग्रेसच्या वतीने दीपावली स्नेहमिलनाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आजी-माजी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काही पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दरम्यान आ. कैलास गोरंट्याल यांनी नेहमीप्रमाणे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर टीका केलीच. त्यासोबत आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे देखील कैलास गोरंट्याल यांचे टार्गेट ठरले आहेत. दीपावली स्नेहमिलनाच्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जालन्याच्या माजी नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल, माजी आमदार सुरेश जेथलिया, मोतीराम अग्रवाल मर्चंट बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पंच, पुरोहित विनायक महाराज फुलंब्रीकर, इकबाल पाशा आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. गोरंट्याल यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी घेतलेल्या दीपावली स्नेहमेलनाचा आवर्जून उल्लेख केला .”ते म्हणाले खोतकर यांचा कोणताही कार्यक्रम असो तो माझ्यावर टीका केल्याशिवाय पूर्ण होतच नाही. जल सम्राटाचा मात्र ते नेहमी आवर्जून उल्लेख करतात .दोन वर्षानंतर आलेली ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी मात्र दुष्काळी दिवाळी आहे, कारण अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना काहीच दिलेले नाही .त्यामुळे आशा…. कृषी मंत्रामुळे सोन्यासारखा सण शेतकऱ्यांना साजरा करता आला नाही. त्यामुळे यापुढे देखील आपण कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना नेहमीच उघडे पाडणार असल्याचेही आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button