Jalna Districtजालना जिल्हा

रेवगाव येथे कीर्तनकारांची होतेय जडणघडण

जालना -शहरापासून सुमारे दहा -बारा किलोमीटर अंतरावर रेवगाव हे गाव आहे .या गावचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बहुतांशी 35℅ ग्रामस्थ हे गोल्डे पाटील या नावानेच आहेत ,आणि त्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्याच पिढीतील वैकुंठवासी प्रेमानंद बाबा उर्फ किसनराव आनंदराव गोल्डे पाटील यांच्या नावाने वारकरी आणि आध्यात्मिक शिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून अखंड हरिनामाच्या सप्ताहाची परंपरा इथे सुरू आहे .आणि त्यामध्ये पाच वर्षांपूर्वी वारकरी आणि आध्यात्मिक शिक्षण संस्थेची भर टाकली आहे. मागील वर्षी या संस्थेतून 11 कीर्तनकार बाहेर पडले आहेत. हे आणखी एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.


ज्या प्रेमानंद बाबा यांच्या नावाने ही संस्था आहे त्या प्रेमानंद बाबांना तीन पत्नी आणि बारा अपत्य आहेत. त्यात पत्नी सरूबाई, कलाबाई आणि दगडाबाई तर अपत्यांमध्ये स्वर्गीय आनंदराव, भीमराव, रंगनाथराव, नारायण गुरुजी, दामोदर (जिजा) एकनाथराव उर्फ नाथा आप्पा ,गंगाधरराव आणि स्व. मुरलीधरराव यांचा समावेश आहे, तर मुलींमध्ये इंदिराबाई, स्व. सरस्वतीबाई शांताबाई आणि कांताबाई या चार बहिणींचा समावेश आहे. अशा एकूण तीन पत्नी आठ मुले आणि चार मुलींचा हा परिवार आहे. चार पिढ्यांचा हा पूर्ण परिवार जरी इतरत्र विखुरलेला असला तरी वर्षातून अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने एकत्र येऊन दिवाळी साजरी करतो. वै. प्रेमानंद बाबांच्या नावाने सुरू असलेली आध्यात्मिक संस्था ही चालवण्याची जबाबदारी या पूर्ण परिवाराने घेतली आहे आणि ती आज तिथे 17 मुले आणि दहा मुली अशी एकूण 27 विद्यार्थी वारकरी, अध्यात्मिक शिक्षण घेत आहेत. या शिक्षणासोबतच शैक्षणिक शिक्षणाची व्यवस्था देखील संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे .

असे दिले जाते शिक्षण :बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची इथे निवासी व्यवस्था आहे. चार वर्ष हे आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. चार वर्षानंतर येथील विद्यार्थी कीर्तनकार म्हणून बाहेर पडतो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथून कीर्तनकार पदवी प्राप्त झालेले लोंढेवाडी येथील कीर्तनकार विष्णु महाराज जोग हे सध्या या विद्यार्थ्यांना आध्यात्मिक आणि कीर्तनाचे धडे गिरवीत आहेत. पहिल्या वर्षी व्याकरण( कीर्तनामध्ये मराठी व्याकरणाला खूप महत्त्व आहे), दुसऱ्या वर्षी गीता पाठांतर, तिसऱ्या वर्षी ज्ञानेश्वरी पाठांतर आणि चौथ्या वर्षी कीर्तनाची तयारी असा अभ्यासक्रम येथे आहे .या अभ्यासक्रमासोबतच संत चरित्र, वारकरी साहित्य, विचारवंतांचे विचार ,अभंग, वाचनासोबतच तबला, पेटी, मृदंग, अभंगाच्या चाली देखील इथे शिकविल्या जातात .

जालना तालुक्यात रेवगाव हे आता कीर्तनकार घडवणारे गाव म्हणून हळूहळू परिचित व्हायला लागले आहे . याचा परिणाम गावामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी होण्यावर झाले आहे .या गावातील तरुण उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे बाहेरगावी असताना देखील या संस्थेमुळे त्यांची गावाशी आजही नाळ जोडलेली आहे. रेवगाव येथील रहिवासी असलेले परंतु सध्या औरंगाबाद येथे पोलीस उपाधीक्षक पदावर कार्यरत असलेले विश्वंभर गोल्डे हे पूर्ण आठ दिवस इथे राहून सर्व कार्यक्रमावर जातीने लक्ष ठेवतात( सविस्तर माहितीसाठी वरील व्हिडिओ पहा)

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button