काय संगता! केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पावकीचा पाढा म्हटला?कुठं?कधी?कसा?
जालना -येथील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दिनांक पाच सहा आणि सात असे तीन दिवस हे अधिवेशन चालणार आहे.
यानिमित्ताने अर्थशास्त्र विषयावर मंथन येथे होणार आहे. आजी-माजी सदस्य मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. उद्घाटनाप्रसंगी नामदार दानवे यांनी राजकीय भाषणाला फाटा देत आजच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य केले. पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आजची शिक्षण पद्धती, पूर्वीचे राजकारण आणि आजचे राजकारण, पूर्वीचे नेते आणि आजचे नेते ,यामधील फरक सांगितला. तसेच आजची शिक्षण क्षेत्राची बिघडलेली परिस्थिती याला शिक्षक किंवा विद्यार्थी जबाबदार नाहीत तर पालकच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला.
पालक कसे जबाबदार आहेत हे सांगत असताना त्यांनी स्वतःचेच उदाहरण दिले आणि” त्या” काळचा चौथीच्या वर्गात शिकलेला पावकी चा पाढा त्यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखवला. अशा हास्याच्या फवाऱ्यामध्ये नामदार दानवे यांनी सुमारे 45 मिनिट भाषण केले. उपस्थित प्राचार्य, प्रोफेसर, विद्यार्थी यांनी देखील त्यांच्या या भाषणाला भरभरून दाद दिली. त्यांनी केलेले भाषण आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आपण वरील दोन्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com