Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

नालीत पाणी मावेना प्रवाशांना पाणी मिळेना; रेल्वे स्थानकावरील परिस्थिती

जालना- गेल्या महिन्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जालन्यात येऊन गेले आणि किरकोळ दुरुस्त्यांपासून मोठ्या दुरुस्त्या केल्या गेल्या. यामध्ये लाखो रुपयांची थातुर्मातुर कामेही झाली. त्यातीलच एक काम म्हणजे जलवाहिन्यांची दुरुस्ती. सध्या नादुरुस्त जलवाहिनीमुळे वाहत जाणारे पाणी नालीत मावत नाही आणि प्रवाशांना पाणीही मिळत नाही.

थातूरमातूर केलेल्या दुरुस्त्या या लगेच जैसे थे झाल्या असून सध्या स्थानकामध्ये लाखो लिटर पाणी वाया जात आहे, प्रवाशांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशी विचित्र परिस्थिती रेल्वे स्थानकात निर्माण झाली आहे. जालना रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनच्या बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून जलवाहिनी फुटलेली आहे. रोज लाखो लिटर पाणी नाली मध्ये जात आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे .त्यासोबत फलाट क्रमांक एक आणि दोन वर देखील काही नळांना पाण्याचा थेंबही येत नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आले होते त्यावेळी या नळांच्या थातूरमातूर दुरुस्त्याही केल्या होत्या, आणि उखडलेल्या फरशा बसविण्यासाठी सिमेंट ही छापले होते, मात्र या सिमेंट वर पाणीच मारलेले नसल्यामुळे या फरशा निघायला लागल्या आहेत. कांही नळांना नवीन तोट्या बसवल्या मात्र त्यामधून अजून एक थेंबही पाणी आले नाही, तर काही नळांच्या तोट्याच गायब झाल्या आहेत.

गेल्या महिन्यात जालना स्थानकातून लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू झाल्या आहेत. 20 ते 25 डबे या रेल्वेला असल्यामुळे पूर्ण फलाटावर रेल्वे उभी राहते. परभणीकडच्या बाजूला दोन्ही फलटावरील नळ बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना पाणीच मिळत नाही .कदाचित रेल्वे स्थानकावरील पाणीविक्रेत्यांची सोय करण्यासाठी हे नळ बंद केले की काय? असा प्रश्नही आता प्रवासी विचारायला लागले आहेत? रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा झाला नसता तर समजून घेण्याची बाब होती. मात्र पाणी असूनही फुटलेली जलवाहिनी दुरुस्त नसल्यामुळे आणि पाणी वितरणाच्या नियोजना अभावी प्रवाशांना मात्र नाहक पैसा खर्च करून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. दरम्यान जे नळ सुरू आहेत त्या नळावर सकाळच्या वेळी स्थानक परिसरात उतरलेले उतार करू आणि फेरीवाले हे स्नान करतात आणि इथेच उरलेले अन्न, पॅकिंगचे डब्बे गुटक्याच्या पिचकाऱ्या, फळाचे उरलेले तुकडे, टाकून घाण करत आहेत खरंतर रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवणे ही प्रवाशांची देखील जबाबदारी आहे, परंतु अशा प्रकारची घाण करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होत नसल्यामुळे घाण आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. एकंदरीतच पाणी असूनही नियोजना अभावी प्रवाशांना मात्र विकतचे पाणी घेऊन भुर्दंड सहन करावा लागत आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button