बाल विश्व

…आणि ती जलवाहिनी दुरुस्त झाली

जालना -गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे स्थानकात एक जलवाहिनी फुटली होती त्यामधून रोज लाखो लिटर पाणी वायाही जात होते .मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते .मंगळवार दिनांक 8 रोजी edtv news या वृत्तवाहिनीवर व्हिडिओसह सविस्तर वृत्त प्रकाशित होताच रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली आणि बुधवार दिनांक 9 रोजी ही जलवाहिनी दुरुस्त केली आहे. त्यामुळे आता वाहून जाणारे पाणी तर थांबले आहे परंतु फलाटावरील नळांना अद्यापही पाणी आलेले नाही. हे पाणी देखील लवकरच सुरू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

मंगळवार दिनांक 8 रोजी प्रकाशित झालेली हीच ती बातमी

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

 

Related Articles