रेशनधान्याचाप्रश्न: एक दिवसीय धरणेआंदोलन

जालना-मुमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर ही सामाजिक संघटना मागील सतरा वर्षांपासून गरीब रेशन कार्डधारक जनतेच्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर कार्यरत आहे . आज या संदर्भातील विविध मागण्यांसाठी जालना तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
देशात अन्न सुरक्षा विधेयक 2013 लागू झालेआहे. महाराष्ट्रातील सात कोटी 16 लाख जनतेला रेशन मिळण्याचा कायदेशीर अधिकार मिळालेला आहे . सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन सतत परिपत्रके काढून प्रशासनाला सूचना आदेश देत आहे. शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही .त्यामुळे रेशनच्या प्रश्नावरील खालील नमूद मागण्यासाठीधरणे आंदोलन करण्यात आले . कार्डधारकाच्या मागण्या पुढील प्रमाणे- अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत मिळणारे धान्य व प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणारे मोफत धान्य ई – पॉस मशीन मधून मिळणारी पावती कार्डधारकांना मिळाली पाहिजे . या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे .अन्यथा दोषी दुकानदारावर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात यावेत .2 -सर्व पात्र लाभार्थ्यांना यांच्या रेशन कार्ड वर पात्रतेचे शिक्के व बारा अंकी आरसी नंबर लिहिण्याची मोहीम राबविण्यात यावी . 3 – रेशन दुकानावर दुकानाचे वेळापत्रक सुट्टीचा दिवस व तक्रार कुठे करावी याबाबतचा बॅनर लावण्यात यावा .4 -किमान 250 कार्डधारकांना दुकानात धान्य आल्याची माहिती / सूचना एस एम एस द्वारे देण्याच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी .5 – प्रत्येक महिन्यात रेशन दुकानावर अन्न दिवस साजरा करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी .6 – तहसील /पुरवठा कार्यालयात नागरिकांची सनद म्हणजे कार्यालयात मिळणाऱ्या सेवा त्यासाठी लागणारा , संबंधित जबाबदार व्यक्तीचे व काम न झाल्यास तक्रार कुठे करावी ,याची माहिती फलक लावण्यात यावा या आणि इतर मागण्यांचा समावेश आहे. संघटनेतर्फअमजद फ़ारूक़ी जिल्हा सचिव,
लतीफोद्दिन सिद्दीकी कोषाध्यक्ष,शेख राईस शहर अध्यक्ष,शेख मुनव्वर ,शहर सचिव.ज़रीना शेख, रईसा शेख, मुमताज़ शेख, हसीना शेख यांची उपस्थिती होती.*****
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com