बाल विश्व

नदी पुनरुज्जीवनाच्या कामात किंतु-परंतु करू नका- जिल्हाधिकारी डॉ. राठोड

जालना- कुंडलिका- सीना नदी पुनरुज्जीवनाच्या पाचव्या पर्वाला आज गुरुवारी शुभारंभ झाला. उद्योगपती घनश्याम शेठ गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप तहसीलदार श्रीकांत भुजबळ पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर समस्त महाजन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई उद्योजक सुनील भाई राठोड, मोतीराम अग्रवाल मर्चंट बँकेचे अध्यक्ष अंकुशशेठ राऊत, उदय शिंदे, ओम प्रकाश चितळकर डॉक्टर प्रकाश आंबेकर मारवाडी युवा मंचचे उमेश बजाज डॉ. अनिल कुलकर्णी, डॉक्टर ओम अग्रवाल, डॉक्टर संजय रुईखेडकर, प्रतिभा श्रीपत, इंजिनीयर अनया अग्रवाल, आनंदी अय्यर यांच्यासह जालन्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की सर्वांसाठीची ही नदी आहे, त्यामुळे कोणीही किंतु परंतु न करता श्रमदानासाठी यावे. या नदीचा सर्वांनाच फायदा होणार आहे .त्यासोबत भविष्यामध्ये नदीच्या काठाने फिरण्यासारखी परिस्थिती निर्माण केल्या जाईल. तसेच ज्या ठिकाणाहून या नदीचा उगम झाला आहे त्या ठिकाणाहून वाहत येणारा गाळ येऊच नये असा देखील प्रयत्न केला जाणार आहे हे काम झाले तर दर पंधरा-वीस वर्षांनी नदीमध्ये येणारा गाळ थांबवता येईल आणि वारंवार आपल्याला नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम पडणार नाही त्या कामाला देखील लवकरच सुरुवात करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना देखील नदीच्या पुनरुज्जीवनाविषयी सविस्तर माहिती द्यायला हवी अशी अपेक्षाही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


जुन्या लोखंडी पुलापासून दर्गा आणि रोहनवाडी पर्यंत नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, त्यामध्ये गाळ काढणे खोलीकरण, रुंदीकरण, आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles