Advertisment
बाल विश्व

कामगार कमी आणि डबे जास्त कसे?- भारतीय मजदूर संघाचा कामगार विभागाला प्रश्न

 जालना-कोरोनाच्या काळात कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या माध्यम भोजन योजना चांगली होती, आता कोरोना काळ संपला आहे त्यामुळे ही योजना बंद करावी, कामगारांची नोंदणी कमी असताना जास्तीचे डबे जातात कुठे ?आणि याविषयी सविस्तर माहिती का दिल्या जात नाही असा प्रश्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने विचारण्यात आला आहे. आज दि.12 रोजी या संघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात मजदूर चेतना यात्रा काढण्यात आली आहे. आणि ही यात्रा आज जालन्यात आली होती.

संघटित आणि असंघटित कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात शासनाला जाब विचारण्यासाठी आणि गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध कार्यालय, आस्थापना ,शेती या विभागात असलेल्या सुमारे पाच कोटी असंघटित कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या” मजदूर चेतना यात्रा”चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

घरेलू कामगार कल्याण मंडळाचे कार्य पूर्ववत सुरू करून 2014 पासून चे लाभ द्यावेत ,धरण क्षेत्रात मच्छिमार कामगारांच्या संस्थांनाच मच्छीमारीचे ठेके द्यावेत, कामगार कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी आणि तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात. नफ्यात चालणाऱ्या सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवावे. बांधकाम कल्याण मंडळाचे लाभ मागील फरकासह पूर्वत सुरू करावेत. कोरोना काळात सुरू झालेली मध्यान भोजन योजना त्वरित बंद करावी. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवावे व रिक्त पदे भरावीत. अशा सेविकांना दरमहा दोन हजार रुपये मानधन द्यावे. या आणि अन्य अशा एकूण 15 मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

यासंदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश महामंत्री मोहन येनुरे, प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, ऍड. विशाल मोहिते, जिल्हाध्यक्ष विजय जोशी, जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब वाघ, संजय सुरवसे, निलेश खरात, आनंद मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय देशपांडे, सय्यद शबीर सय्यद हुसेन, आदींची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश महामंत्री मोहन युनुरे यांनी कामगार अधिकारी कार्यालयावर चांगला रोष व्यक्त केला. सर्वात जास्त भ्रष्टाचार या कार्यालयात होत असून यासंदर्भात कोणतीही माहिती पुरविल्या जात नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे इथे दलाल वाढले आहेत आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत याचा लाभत जात नसल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान मध्यान भोजन योजना रद्द करावी आणि बांधकाम कामगारांना थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणीही त्यांनी केली.हिचपद्धत सर्व कामगारांच्या बाबतीत सुरू करावी जेणेकरून कामगारांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा, भोजनाच्या सुविधा, त्यांना ज्या ठिकाणी हव्या आहेत त्या ठिकाणी घेता येतील, आणि दलालांचा सुळसुळाट, भ्रष्टाचार या दोन्ही बाबींना आळा घालता येईल असेही ते म्हणाले.


दरम्यान सहा ते 17 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्राचे 21 जिल्ह्यांमध्ये 125 मधून मजदूर चेतना यात्रा प्रवास करीत आहे आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात दिनांक 21 डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर लाखो कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.**

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button