राष्ट्रीय लोक न्यायालयात 2185 प्रकरणे निकाली

जालना-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात 2185 प्रकरणे निकाली निघाली आहेत.
या न्यायालयात न्यायदान करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते, जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.डी. देव. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव आर. आर. आहेर . जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रामेश्वर गव्हाणे यांची उपस्थिती होती.
या राष्ट्रीय लोक न्यायालयात कौटुंबिक वादाची प्रकरणे, दावा दाखल प्रकरणे, आदि खटल्यांचा समावेश होता. त्यामध्ये दावा दाखल पूर्व 1137 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये दोन कोटी 36 लाख 31 हजार 81 रुपयांची तडजोड करण्यात आली. न्यायालयात प्रलंबित असलेले 597 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये सहा कोटी 74 लाख 8457 ची तडजोड करण्यात आली. आशा एकूण 2491 प्रकरणांचा निपटारा या लोकन्यायालयात करण्यात आला, आणि एकूण नऊ कोटी दहा लाख 39 हजार 538 रुपये रक्कम वसूल झाली आहे. त्याचसोबत वाहतूक शाखेच्याही अनेक प्रकरणांचा निपटारा यामध्ये करण्यात आला. कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या 11 जोडप्यांचा वाद आजच्या या राष्ट्रीय लोक न्यायालयात मिटविण्यात आला आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com