न्यायाधीशांनाही वाटलं शासकीय योजनांचे कुतुहल
जालना-न्यायालय म्हटलं की तसे सारे जण दोन हात दूरच राहतात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया आणि विशेष करून न्यायाधीश पाहायला आणि त्यांच्यासोबत बोलायला फारसं कोणी धजत नाही.कारण त्यांचा राजशिष्ठाचार पाहूनच अनेकांना धडकी भरते. आणि काही शासकीय बंधनांमुळे न्यायाधीशांना देखील सामान्य जनतेत वावरता येत नाही. परंतु आज आठवडी बाजारात मात्र या बंधनातून दोन्ही बाजू मुक्त झाल्या होत्या. सामान्य माणसांना न्यायाधीशांसोबत बोलता येत होते आणि न्यायाधीशांनी देखील तेवढाच प्रतिसाद देत सामान्य माणसांसोबत संवाद साधून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली .निमित्य होते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन.
जुन्या जालन्यातील नगरपालिकेसमोर रविवारचा आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारामध्ये पोस्ट ऑफिस, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महामंडळाची कार्यालय, शिक्षण विभाग, अशा विविध शासकीय कार्यालयांच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते .या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी वर्ग एकच्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती ए.डी. देव, यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सदस्य सचिव आर. आर. आहेर, तसेच न्यायाधीश श्रीमती गारे, न्यायाधीश श्रीमती अडकिने, न्यायाधीश श्रीमती शिंदे, न्यायाधीश श्री. जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.विशेष करून महिला न्यायाधीशांनी शासकीय योजनांची इत्यंभूत माहिती घेतली.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com