बाल विश्व

67 वर्षाच्या वृद्धाला बाललैंगिक छळ भवला; तीन वर्षे कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड

जालना- किराणा दुकानात चॉकलेट गोळ्या घेण्यासाठी आलेल्या आठ वर्षाच्या बालिकेचा लैंगिक छळ करणे 67 वर्षाच्या वृद्धाला चांगलेच भवले आहे. न्यायालयाने या वृद्धाला तीन वर्ष कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नूतन वसाहत भागात एक किराणा दुकान आहे या किराणा दुकानांमध्ये परिसरातीलच एक आठ वर्षाची मुलगी सहा जुलै 2019 रोजी चॉकलेट गोळ्या घेण्यासाठी आली होती. पंधरा-वीस मिनिटांनी ही मुलगी घरी गेल्यानंतर रडू लागली आणि रडण्याचे कारण तिच्या आईने विचारले असता तिने सांगितले की,” दुकानातील काकांनी मला आत मध्ये बोलावून घेतले दहा-पंधरा मिनिट मांडीवर बसवले चॉकलेट दिले आणि कोणाला काही सांगशील तर मार खाशील अशी धमकीही दिली “


ही सर्व हकीकत ऐकल्यानंतर पीडित मुलीच्या आईने कदीम जालना पोलीस ठाण्यात भादवि कलम 354 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये तक्रार नोंदविली. या तक्रारीचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात सादर केले आणि या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांनी या प्रकरणातील आरोपी रंगनाथ श्रीपतराव आव्हाड वय 67, राहणार नूतन वसाहत जुना जालना यांना तीन वर्षे सश्रम कारावास दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.सरकार पक्षाच्या वतीने विधीज्ञ सहाय्यक तथा अतिरिक्त सरकारी वकील वर्षा मुकीम यांनी काम पाहिले.

या मुलीला दुकानात बोलावून रंगनाथ श्रीपतराव आव्हाड वय वर्ष 67 यांनी मांडीवर बसवले आणि तिच्या छळ केला.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button