Jalna Districtजालना जिल्हाराज्य

शास्त्रोक्त पद्धतीने 90 वटवृक्षांना मिळणार पुनर्जीवन; रस्ता रुंदीकरणामुळे जात होता वटवृक्षांचा बळी

जालना- विकास कामांच्या आड येणाऱ्या किंवा रस्ता रुंदीकरणात अडचणीचे ठरणाऱ्या सुमारे 90 वटवृक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात येत आहे.


मंठा ते जिंतूर या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे, सुमारे 90 वटवृक्ष या रस्ता रुंदीकरणाच्या आत मध्ये येत आहेत. विविध ठिकाणी असलेल्या या वटवृक्षांना नष्ट न करता त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करून पुन्हा एकदा या वटवृक्षांना जीवनदान देण्याचा उपक्रम सुरू आहे. नगर जिल्ह्यातील काष्टी येथे असलेल्या पानसरे नर्सरी यांच्या माध्यमातून आणि या रस्त्याचे कंत्राटदार घोडके यांच्या सहकार्याने या वटवृक्षांची पूनर्लागवड मोहीम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आवाढव्य आणि वर्षानुवर्ष टिकणारा वटवृक्ष स्थलांतरासाठी खूपच अवघड आहे मात्र या वटवृक्षाच्या स्थलांतरापूर्वीचा खटाटोप हा इतर झाडांच्या तुलनेत कमी आहे. तो कसा कमी आहे? एखादे झाड स्थलांतरित करण्यापूर्वी त्याला किती वेळ लागतो? त्याच्यावर काय- काय प्रक्रिया करावी लागते? ते किती दिवसांनी पुन्हा टवटवीत होतात? या सर्व बाबींची उत्सुकता असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न च्या या विशेष बातमीत घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. झाडांच्या या स्थलांतराचे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या बाळासाहेब पानसरे यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे.


मंठा ते देवगाव फाटा दरम्यान सध्या या वटवृक्षांचे स्थलांतर सुरू आहे.दिडशेवर्षांपूर्वीची ही झाडे आहेत.त्यामुळे त्यांच्या मुळ्या दूरवर पसरल्या आहेत.त्यांना योग्य पद्धतीने कापून आणि आहेत त्या मुळ्याना पाणी,घटकद्रव्ये, योग्य तो ओलावा मागील 6 महिन्यापासून पुरविल्या जातो,आणि नवीन मुळ्या आल्या नंतर या झाडाचे स्थलांतर केल्या जाते,जेणेकरून ही झाडे लवकर जमिनीशी एकरूप होऊन वाढीस लागतील.****

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button