अभिनेते सयाजी शिंदेंनाही वृक्ष पुनरुज्जीवनाची भुरळ; हेलस पासून सुरुवात
जालना-अभिनेते सयाजी शिंदे यांनाही पुरातन झाडांच्या पुनर्जीवित करण्याच्या कामाने भुरळ घातली आहे.त्याच्या मदतीने मंठा तालुक्यात या कामाला सुरुवात झाली आहे.
मंठा या तालुक्याच्या ठिकाणापासून पाच-सहा किलोमीटरवर असलेलं “हेलस” हे एक छोटसं गाव .29 वर्षांपूर्वी या गावचे भूमिपुत्र असलेल्या दत्तात्रय हेलसकर यांनी, साने गुरुजी कथा मालेची जालना जिल्ह्यात पहिल्यांदा सुरुवात केली. त्यामुळे हेलस हे नाव जिल्ह्यात सर्वदूर पोहोचले. आणि हेलस हे नाव चर्चेत आलं. आता पुन्हा एकदा या नावाची चर्चा होणार आहे. ती म्हणजे जालना शहर वगळता जिल्ह्यामध्ये वटवृक्षाला पुनर्जीवित करणार हेलस हे बहुतेक पहिलाच गाव ठरणार आहे. “सह्याद्री देवराई ,फिल्मस्टार वृक्षमित्र सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून या झाडाचा स्थलांतर सोहळा मंगळवार दिनांक 15 रोजी पार पडला.
मंठा- जिंतूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे आणि त्यामुळे सुमारे 90 वटवृक्ष रस्त्यावरून हटविले जाणार आहेत. या सर्व वटवृक्षांची पुनर्जीवनाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यापैकीच हा एक वटवृक्ष. या गावचे भूमिपुत्र आणि तरुण बंधू सचिन साखरे आणि संकेत साखरे यांच्या पुढाकाराने वटवृक्ष स्थलांतर सोहळा पार पडला .यासाठी जालना येथील उद्योगपती सुनील रायठ्ठा, पानसरे नर्सरी चे संचालक बाळासाहेब पानसरे ,मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास बोराडे, पांडुरंग खराबे यांची उपस्थिती होती. स्थलांतर करण्यासाठी महामार्गाच्या कामाचे कंत्राटदार बी. आर. घोडके यांचे देखील सहकार्य लाभले आहे. दरम्यान गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे या वटवृक्षाला आपण पुनर्जीवन देऊ शकलो आहोत अशी भावना संकेत साखरे यांनी व्यक्त केली आहे .
महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर हेलस या गावात प्रवेश करतानाच आता पहिल्यांदा दिसायला लागेल तो पुनर्जीवित झालेला दीडशे वर्षांचा वटवृक्ष.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com