Jalna Districtजालना जिल्हाराज्य

माळरानावर फुलविले साडेचार लाख रुपयांच्या गांजाची रोपे, पोलिसांनी टाकला छापा

जालना- मंठा तालुक्यातील शेतकऱ्याने डोंगर माथ्यावर माळरानावर गांजाची शेती फुलविली होती, मात्र पोलिसांनी छापा टाकून हा गांजा उपटून आणून जप्त केला आहे. सुमारे साडेचार लाखांची ही झाडे पोलिसांनी जप्त केली असून शेतकऱ्याविरुद्ध गुन्हाही नोंद केला आहे


मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्यासह मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे शिवारामध्ये बुधवारी दुपारी दोन वर्षाच्या सुमारास छापा टाकला. गट क्रमांक 367 मधील प्रदीप थावरा राठोड यांच्या शेतावर छापा टाकून विविध ठिकाणी आणि कानाकोपऱ्यामध्ये ओळखायला येणार नाहीत अशा ठिकाणी गांजाची लागवड केली होती. सर्वच शेत पिंजून काढल्यानंतर पोलिसांना गांजाची 23 झाडे सापडली आहेत. या झाडांना तोडून त्याचे वजन केले असता 31 किलो भरले आहे, आणि याची बाजारात सुमारे चार लाख 65 हजार रुपये किंमत आहे. हा छापा टाकण्यासाठी पोलिसांनी पूर्वतयारी मध्ये पंच, प्रमाणित वजन काटा, छायाचित्रकार असा सर्व लवाजमा एका खाजगी वाहनाने शिवारापर्यंत नेला होता. शेतापर्यंत चार चाकी वाहन जात नसल्यामुळे पोलिसांनी दुचाकी वाहनाचा सहारा घेत शेतामध्ये छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे, पोलीस कर्मचारी श्याम गायके, मांगीलाल राठोड, दीपक आढे, विजय झुंबड, आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button