वनविभागाची सर्वात मोठी धाडसी कारवाई ; पाच लाकूड कापण्याच्या मशीन जप्त; 124 कर्मचाऱ्यांची उपस्थिती; वनाधिकारी पुष्पा पवार यांचे नियोजन
जालना- गेल्या अनेक वर्षांची सॉ मिल चालकांची दादागिरी मोडीत काढत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दि.18 रोजी जालन्यातील तीन सॉ मिल चालकांवर धाड टाकून लाकूड कापण्याचे पाच यंत्र,जळतन आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नियोजनबद्ध आखणी करून आज 124 कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली .औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी ही धाडसी कारवाई केलीआहे.
याच त्या महिला वन अधिकारी पुष्पा पवार
कशी टाकली धाड पहा
जालना शहरात लक्कडकोट नावाने परिचित असलेल्या या भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लाकडाचा अवैध व्यवसाय सुरू होता .परंतु अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आणि सॉ मिल चालकांच्या दादागिरीमुळे इथे धाड टाकण्यास कोणी धजावत नव्हते. ही दादागिरी मोडीत काढत गेल्या अनेक दिवसांपासून सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आणि अत्यंत गोपनीय पद्धतीने आज ही कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण तीन लाकडांच्या गिरण्यावर धाड टाकली आहे. त्यामध्ये दिनेश चौधरी, सत्यनारायण सॉ मिल, भोळे शंकर सॉ मिल, संतोष टिंबर मार्ट यांचा समावेश आहे. तसेच दिनेश चौधरी यांची लाकूड कापण्याची दोन अवैध यंत्रे, सत्यनारायण सॉ मिल,यांच्याकडील एक अवैध यंत्र ,भोळे शंकर सॉ मिल येथील एक आणि संतोष टिंबर मार्ट यांच्याकडील एक अशी एकूण पाच लाकड कापण्याची अवैध यंत्रे जप्त करण्यात आली आहेत . ही यंत्र जप्त करण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला तसेच गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीमध्ये पक्की करून ठेवलेली ही यंत्रणा उघडण्यासाठी इलेक्ट्रिक कटर आणि गॅस वेल्डिंगचाही वापर करण्यात आला .
या कारवाईत वनपरिक्षेत्र उत्तर विभागाचे अधिकारी अभिमन्यू खलसे, वनपरिक्षेत्र दक्षिण विभागाचे अधिकारी अभय अटकळ ,यांच्यासह अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे, सिल्लोड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. भिसे, सोयगाव येथील श्री. मिसाळ औरंगाबाद येथील वनपरिक्षेत्राधिकारी दादा तौर, यांच्यासह खुलताबाद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पेहरकर, आनंद गायके, सुशील नांदवटे, यांचा समावेश होता. त्यांच्या मदतीला सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते. दहा वनाधिकाऱ्यांसह 92 वन कर्मचारी दोन पोलीस अधिकारी आणि 20 पोलीस कर्मचारी अशा एकूण 124 अधिकारी कर्मचाऱ्यांची या धाडसत्रात उपस्थिती होती.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com