आम्ही का राहुल गांधीच्या तोंडात जाऊन बसलो होतो?- केंद्रीय राज्यमंत्री खा. दानवे
जालना- “त्यांनी आधी फारकत घेणार का?का सोबत राहणार हे सांगावे. त्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्यासाठी आम्ही काय राहुल गांधीच्या तोंडात जाऊन बसलो होतो? अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली. जालन्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्र पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या पक्षाला त्यांच्याच मित्रपक्षाने डीवचिले आहे, आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि नातू आहेत. त्यामुळे त्यांनी अगोदर मित्र पक्षासोबत राहणार का फारकत घेणार हे जाहीर करावे आणि मग इतर बाबींवर बोलावे, अशी प्रतिक्रिया सध्या शिवसेनेच्या गटामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर दिली.
दरम्यान विद्या चव्हाण यांनी राहुल गांधीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वादग्रस्त विधानसंदर्भात वक्तव्य करताना भाजपानेच हे घडून आणले आहे असे म्हटले आहे, याचाही समाचार खासदार दानवे यांनी घेतला “आम्ही काय राहुल गांधीच्या तोंडात जाऊन बसलो होतो? असा प्रति प्रश्नही केला आहे. ज्यांना राष्ट्र पुरुषांबद्दल अभ्यास नाही, ज्यांना वाचन नाही अशा लोकांनी हे घडवून आणलं आहे. खरंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्या विचारात आहेत, ते आमच्या आचरणात आहेत, ते आमच्या मनात आहेत हे आम्ही नाकारतच नाहीत ते आमचेच आहेत. असेही खासदार दानवे यांनी म्हटले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com