Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

शनिवारी होणार श्रीराम मूर्तींची पुनःस्थापना; दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन

जालना -घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून मूर्तींची चोरी झाली होती. या मूर्ती पोलिसांनी शोधून काढल्या आहेत आणि या मूर्तींचा पुनःस्थापन सोहळा दिनांक 25 आणि 26 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे.

   अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा

 

यासंदर्भात जांब येथे तयारीला सुरुवात झाली आहे आणि समर्थांचे वंशज भूषण महारुद्र स्वामी हे या भव्य दिव्य सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. या मूर्तींची चोरी झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. पोलिसांनी देखील शर्तीचे प्रयत्न केले होते, मात्र यश येत नसल्यामुळे त्यांनी या मूर्तींची माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. शेवटी पोलिसांनीच या मूर्तींचा शोध लावला आहे .समर्थ रामदास स्वामींच्या झोळीतील एक मारुती सोडला तर बाकी सर्व मूर्ती पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत .दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार या मूर्ती मंदिर व्यवस्थापनाकडे सुपूर्त केल्या जातील आणि शुक्रवार दिनांक 25 आणि शनिवार दिनांक 26 रोजी या मूर्तींची पुन्हा स्थापना होणार आहे .

श्रीराम मूर्ती पुनःस्थापन सोहळ्याची रूपरेषा
मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया, शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत श्रीराम मूर्तींची मिरवणूक. दोन ते तीन आगमन सोहळा व आरती. तीन ते पाच कृतज्ञता सन्मान सोहळा. पाच ते सहा सांप्रदायिक उपासना आणि रात्री नऊ ते अकरा बीड येथील मठाधिपती सद्गुरु भक्त ऋतुपर्ण बुवा रामदासी यांचे कीर्तन .

*मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर सकाळी सहा ते सात वाजे दरम्यान तेरा तास अखंड त्रयोदशाक्षरी राम मंत्र जप. सहा वाजता श्रीराम मूर्ती स्नपनविधी व महाभिषेक पूजा .सकाळी सात वाजून 41 मिनिटांनी पुनःस्थापन विधी मुहूर्त व महाआरती. सकाळी साडेआठ ते साडेनऊ श्रीमारुतीस रुद्राभिषेक. सकाळी साडेदहा ते साडेबारा पवमान स्वाहाकार व पूर्णाहुती. साडेबारा वाजता महाप्रसाद. सायंकाळी सहा वाजता सांप्रदायिक उपासना आणि सात वाजता कार्यक्रमाची सांगता. अशा दोन दिवसीय श्रीराम मूर्ती पुनःस्थापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button