Jalna Districtजालना जिल्हा

श्रद्धा वालकर हत्याकांड; सकल हिंदू समाजाच्या वतीने जालन्यात अभुतपूर्व मूक मोर्चा

जालना -श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आज सोमवारी जालन्यामध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने निघालेल्या या मूक मोर्चा मध्ये महिलांची अभुतपूर्व संख्या दिसून आली.

हुतात्मा जनार्दन मामा चौकातून सायंकाळी सहा वाजता हा मूक मोर्चा निघाला आणि सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात या मोर्चाचा समारोप झाला. यावेळी तरुणींनी आपले मनोगतही व्यक्त केले .तरुण -तरुणींच्या हातामध्ये विविध नामफलक झळकत होते. शांततेत निघालेल्या या मोर्चासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आजच्या मोर्चामध्ये सर्वच समाजाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये गृहिणी, उद्योजिका ,व्यावसायिका, आदी महिलांची संख्या लक्षणीय होती ,त्याचप्रमाणे पुरुषांची देखील मोठी संख्या होती. या मोर्चाचे पहिले टोक फुल बाजारात तर शेवट हुतात्मा जनार्दन मामा चौकात असा हा दिव्यमोर्चा निघाला होता.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button