Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

“सुंदर माझं कार्यालय” उपक्रमाला पंचायत समितीमध्ये सुरुवात

जालना- जालना तालुक्यातील 123 ग्रामपंचायत स्वच्छ करण्याचा निर्धार जालन्याचे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी यांनी केला आहे. याची सुरुवात स्वतःच्या पंचायत समिती कार्यालयापासून सुरू केली असल्याची माहिती जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी यांनी दिली.

सुमारे दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी “सुंदर माझं कार्यालय “ही संकल्पना राबविण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने सुरुवातीला अनेक कार्यालयात ही संकल्पना राबविली गेली. अडगळीला पडलेले संचिकेचे गठ्ठे तुटलेल्या खुर्च्या फुटलेले कम्प्युटर मोडलेल्या झेरॉक्स मशीन असे सर्व साहित्य भंगार मध्ये काढून कार्यालय स्वच्छ करण्यात आली. संचिकेचे त्यांच्या मुदतीप्रमाणे विविध प्रकारच्या रंगांची कपडेही बदलण्यात आले, मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे ही कामे मागे पडली.


चार दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जालन्यामध्ये आढावा बैठक घेतली आणि या बैठकीत पुन्हा या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. परंतु फारसा काही प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना या उपक्रमाची आठवण करून दिली. त्याला प्रतिसाद देत जालना पंचायत समिती कार्यालयापासूनच या उपक्रमाला सुरुवात केली असल्याची माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली आहे. जालना तालुक्यामध्ये 123 ग्रामपंचायत आहेत आणि या सर्वच ठिकाणी जालना पंचायत समिती प्रमाणे “सुंदर माझं कार्यालय” ही संकल्पना ते राबविणार असे आहेत. सोमवारी आठवडी कामकाजाचा पहिला दिवस असतानाही सकाळी साडेदहा वाजताच जालना पंचायत समिती कार्यालयात आलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या हातात झाडू, खराटे दिसले आणि पंचायत समितीचा परिसर स्वच्छ करून कामाला लागले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button