एक हजार40 वर्षानंतर पुन्हा साजरा झाला उत्सव
घनसावंगी- (बाळासाहेब ढेरे) श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीरामांच्या मूर्तींची पुनःस्थापना आज शनिवार दिनांक 26 रोजी करण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी या मूर्तींची चोरी झाली होती ,मागील महिन्यात या मूर्ती सापडल्या .त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली आणि काल दिनांक 25 रोजी घनसांवगी पोलिसांनी या मूर्ती श्रीराम मंदिर संस्थांच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केल्या.
या मूर्तींची काल भव्य मिरवणूक ही काढली होती, आणि आज या मूर्तींची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे. भव्य दिव्य होम हवन करून आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात ही स्थापना करण्यात आली. समर्थ रामदासांचे वंशज भूषण स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार जांब येथे शके 904 मध्ये रामनवमीचा उत्सव झाला होता आणि आज शके 1944 सुरू आहे म्हणजेच सुमारे एक हजार 40 वर्षानंतर जनतेला हे वैभव पाहायला मिळाले आहे. सामान्यजणांचं असलेलं हे दैवत, वैभव आज पुन्हा एकदा जांब समर्थ च्या श्रीराम मंदिरात विराजमान झाला आहे, त्यामुळे प्रत्येकाचं हृदय आनंदाने भरून गेलं आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com