Jalna District

संविधान दिन उत्साहात साजरा

जालना, – संविधान दिनानिमित्त आज  दि.26 रोजी सकाळी  सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षा  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेश अहिर  यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवर न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन केले.

श्रीमती मोहिते यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्व विशद करून सर्वांना भारतीय नागरिकांचे कर्तव्य व अधिकार या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच समता पर्वाच्या निमित्ताने संविधानाबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन केले.  त्यानुषंगाने जालना जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय व शाळा यांनी संविधान विषयक व्याख्याने, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करावेत, असे आवाहन केले. तसेच जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जालना यांचेमार्फतही शाळा व महाविद्यालयामध्ये संविधान जनजागृतीबाबत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा,असेही आवाहन केले.

सहायक आयुक्त, समाज कल्याण अमित घवले  यांनी प्रस्तावनेत संविधान निर्मीतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने 26 नोव्हेंबर, 2022 संविधान दिन ते 6 डिसेंबर, 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरे करण्यात येणार आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे   सांगितले.

त्यानंतर अनुसूचित जातीच्या मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना व स्वामी विवेकानंद विद्यालय, जालना या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संविधान रॅलीला  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वर्षा मोहिते,   जिल्हा व सत्र न्यायाधीश-1 श्रीमती ए. डी. देव,   सदस्य सचिव, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण राजेश अहिर, पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे,  जालना,  उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले,  सहायक आयुक्त, समाज कल्याण अमित घवले, विशेष अधिकारी (शा.नि.शा.), सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय दत्तात्रय वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवुन रॅलीची सुरुवात केली.अंबड चौफुली मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करुन संविधान रॅलीची सांगता करण्यात आली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button