साडेपाच वर्षाच्या बालिकेचा ब्लेडचे वार करून बाथरूम मध्ये खून!
जालना- साडेपाच वर्षाच्या बालिकेचा ब्लेडने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
मंठा रोडवर असलेल्या चौधरी नगर भागात ईश्वरी रमेश भोसले (वय साडेपाच वर्षे) ही आपल्या काकाकडे शिकण्यासाठी आली होती. दिनांक 11 जून 2022 रोजी तिचा घराजवळच असलेल्या स्वरूप इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशही झाला होता. तिचे काका काकू सोडण्यासाठी शाळेत येत होते आणि सर्व काही सुरळीत सुरू होतं. आई वडील घनसांवगी तालुक्यातील गुंज येथे राहायला असल्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी ईश्वरीला गणेश भोसले यांच्याकडे ठेवले होते. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चौधरी नगर भागातील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या गणेश यांच्या बाथरूममध्ये रक्ताने माखलेली ईश्वरी दिसून आली. तिच्या दोन्ही हातावर आणि गळ्यावर ब्लेडच्या खोलवर जखमा झालेल्या आहेत. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता. अशा अवस्थेत तिला मंठा चौफुली येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टर आणि तिला मृत घोषित केले. दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग तालुका पोलीस ठाण्याचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या सर्व घटनेची माहिती घेतली. त्यानुसार प्राथमिक अंदाजावरून हा खून कोणीतरी लहान व्यक्तीने केल्याचा संशय बळावला आहे. कारण ज्या व्यक्तीने हा खून केला आहे त्या लहान व्यक्तीने घरामध्ये येऊन आपले कपडेही बदललेले आहेत, तसेच बाथरूम मध्ये पाणी टाकून स्वच्छता केली आहे, परंतु घरात कपडे बदलल्यानंतर रक्ताने भरलेल्या पायाची ठसे जागोजागी दिसत आहेत.
ईश्वरी चे काका दुसऱ्या एका ठिकाणी प्रयोगशाळा चालवतात त्यामुळे दिवसभर त्यांच्या घरी त्यांची पत्नी आणि त्यांची इतर दोन मुले हेच राहत होते. त्यामुळे घरातीलच लहान व्यक्तीने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.
दरम्यान याप्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहे.ईश्वरी बाबत तिचे काका आणि काकू चांगली काळजी घेत होते, दोघेही तिला सोडायला आणि घेऊन जायला यायचे, तसेच दिनांक 11 जून 2022 रोजी तिचा पहिल्यांदा या शाळेत प्रवेश झाला त्यावेळेस देखील काका काकूच आले होते, ईश्वरी ही अत्यंत शांत आणि आज्ञाधारक होती. आधार कार्ड नुसार तिची जन्मतारीख 10 जून 2017 असल्याची माहिती स्वरूप इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा तोटे यांनी दिली आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com