तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीचे सामने रंगले

जालना -क्रीडा व युवा सेवा संचालनालय यांच्या वतीने सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी संघाची संख्या लक्षणीय आहे. तालुक्यातील सुमारे 85 कबड्डी संघाने या मध्ये सहभाग नोंदविला आहे. मत्योदरी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आज या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी श्रीमती गीता नाकाडे, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. आर. गायकवाड ,प्राचार्य मिलिंद पंडित ,यांच्यासह क्रीडा विभागाचे प्राध्यापक संजय, शेळके, प्राध्यापक भुजंग डावखर, यशवंत कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.
एकाच मैदानावर तीन वेगवेगळ्या वयोगटातील होणाऱ्या या स्पर्धांमुळे खेळाडूंची प्रचंड गर्दी झाली होती ,आणि त्यांच्या जल्लोषामुळे खेळामध्ये चैतन्य निर्माण झाले होते. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच मैदानावर मुले- मुली असल्यामुळे पोलिसांची ही यावेळी उपस्थिती होती. दरम्यान आज पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. इथे विजयी झालेला संघ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये खेळणार आहे.
17 वर्षाखालील मुला मुलींसाठी या स्पर्धांचे आयोजन केले आहे क्रिकेट आणि अन्य काही विभागांच्या स्पर्धाही लवकरच होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीमती गीता नाकाडे यांनी दिली आज सहभागी झालेल्या कबड्डी संघांची संख्या ही लक्षणीय असल्याचे त्या म्हणाल्या. क्रीडा स्पर्धांचे पंच म्हणून रवी ढगे आणि त्यांचे सहकारी कार्यरत आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com