Jalna Districtजालना जिल्हा

शहरात अवजड वाहनासोबत अपघात; विद्यार्थी गंभीर जखमी: भर दिवसा सुरू आहे शहरात अवजड वाहनांची भरधाव वाहतूक

जालना- सिमेंट भरून जाणाऱ्या एका ट्रकचा जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स परिसरात एका शालेय विद्यार्थ्यासोबत झालेल्या अपघातात विद्यार्थी जखमी गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्राथमिक उपचारासाठी सामान्य रुग्णालय त्यानंतर दीपक हॉस्पिटल आणि पुढील उपचार उपचारासाठी लगेच औरंगाबाद येथे हलविले आहे.

दरम्यान जालना शहरांमध्ये भर दिवसा अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यातच दुपारी शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ असल्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी या भरधाव वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जालना रेल्वे स्थानकात मालगाडीतून सिमेंट, खत, गहू, तांदूळ, अशा प्रकारचे साहित्य उतरते आणि हे उतरलेले साहित्य ठराविक ठिकाणी पोहोचवून परत येऊन गाडीचा क्रमांक लावण्यासाठी या अवजड वाहनांची मोठी धावपळ असते. रस्त्याने देखील ही अवजड वाहने अंदाधुंद पद्धतीने चालविली जातात. खरे तर अशा अवजड वाहनांसाठी रेल्वे स्थानकातूनच मंठा चौफुली कडे जाण्यासाठी एक रस्ता ही आहे मात्र त्या रस्त्याने ही वाहने न पळविता गावातून पळविली जातात.

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या बालमटाकळी येथील विद्यार्थी मंगेश दारासिंग भोंगळे वय( 17 वर्षे)हा जालना तालुक्यात खरपुड येथे असलेल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये वस्तीगृहात शिकण्यासाठी आहे. काही कागदपत्रासाठी तो गावाकडून जालन्यात आला होता, आणि त्याची नातेवाईक दिव्या रवी छाजेड ही त्याला अंबड चौफुलीवर सोडण्यासाठी सतकर कॉम्प्लेक्स कडून अंबड चौफुली कडे जात होती. दरम्यान पाठीमागून आलेल्या सिमेंटने भरलेल्या ट्रक क्रमांक एम एच 04 ई एल 31 24 ने या दुचाकी ला ठोस दिली आणि दोघेही खाली पडले, मंगेश हा गंभीर जखमी झाला आहे आणि त्याला प्राथमिक उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती केले होते. मात्र नातेवाईकांनी त्याची परिस्थिती पाहून दीपक हॉस्पिटल येथे नेले आणि दीपक हॉस्पिटल मधून पुढील उपचारासाठी त्याला लगेच औरंगाबाद येथे पाठविले आहे. दिव्याला देखील किरकोळ मार लागला आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी गणेश भोंगळे याला सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत केली. त्याच्यासोबत या ट्रकचा चालक मोहम्मद इरफान मोहम्मद जिया ,राहणार मिल्लत नगर जुना जालना यालाही रुग्णालयात आणले होते .काही वेळात कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सय्यद यांनी रुग्णालयात येऊन ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button