पाणी पिणेच बेतले जीवावर; तीन बैलांचा बुडून मृत्यू
परतुर- पाटामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन बैलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. परतुर तालुक्यातील कोकाटे हदगाव तांडा येथील शेतकरी सुनील पांडुरंग चव्हाण या शेतकऱ्याचे हे पशुधन होतं.
सुनील चव्हाण यांच्या कडे काम करणाऱ्या शेतातील गड्याने रोजच्या प्रमाणे आज सकाळी 11:30 च्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर नेले. दोन बैलगाडीला जुंपले होते आणि दोन बैल पाठीमागे बांधलेले होते. कालव्याजवळ जातात बैल अचानक उधळले आणि कालव्यामध्ये गेले. सध्या कालवा हा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. चार बैलांपैकी एका बैलाला वाचवण्यात शेतकऱ्याला यश आले आहे. उर्वरित तीन बैल बुडाले आहेत या चार बैलांवर सुमारे 12 एकर शेती वहीती केल्या जात होती.या बैलांपैकी महिनाभरापूर्वीच एक 70 हजाराची नवीन बैल जोडी शेतकऱ्यांनी खरेदी केली होती. ही बैल जोडी आणि जुना एक बैल असे सुमारे दीड लाखांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे.
दरम्यान झालेल्या नुकसानीचा पंचनामा गावच्या तलाठ्यांनी केला आहे. तसेच शासनाने देखील नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुनील पांडुरंग चव्हाण यांनी केली आहे .
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com