Jalna Districtजालना जिल्हाराज्य

एकही उल्लू काफी था……-आ. कैलास गोरंट्याल

जालना- महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते हिमांशू त्रिवेदी आणि अन्य काही मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या अप शब्दाचा निषेध म्हणून दिनांक 7 डिसेंबर रोजी जालना बंदची हाक देण्यात आली आहे. सत्ताधारी पक्ष वगळता सर्वच संघटना, राजकीय पक्ष यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.

दरम्यान या बंदपूर्वी तीन तारखेला खासदार उदयनराजे भोसले हे रायगडावर “आक्रोश” करणार आहेत. ते करत असलेल्या या आक्रोशला पाठिंबा देण्यासाठी दिनांक तीन रोजी जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलनही करण्यात येणार असल्याची माहिती आमदार गोरंट्याल यांनी दिली. या नियोजनासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी आमदार गोरंट्याला बोलत होते, यावेळी अरविंद देशमुख सुरेश मुळे आदींची उपस्थिती होती. तसेच सत्ताधारी पदाधिकारी वारंवार महिलांबद्दल आणि राष्ट्र राष्ट्र पुरुषांबद्दल अपमान जनक शब्द वापरत आहेत त्यांना आवरा नाहीतर असे म्हणावे लागेल की,
” एकही उल्लू काफी था बरबाद- ए- गुलिस्तान के लिए।
यहा हर शाक पे उल्लू…( पूर्ण ऐकण्यासाठी कृपया व्हिडिओ पहा)

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button