बाल विश्व

गोवरची लस घेतली का? नसेल घेतली तर घ्या! अजूनही वेळ गेलेली नाही

जालना- सध्या गोवरच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे, परंतु उद्रेक मात्र झालेला नाही. हा उद्रेक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणाची गती वाढविण्यात आली आहे.

दरम्यान दोन वर्षांपूर्वीच्या  दोन वर्षाच्या कोविडच्या काळामध्ये  लाभार्थ्यांच्या दुर्लक्षामुळे म्हणा किंवा प्रशासनाच्या अडचणीमुळे म्हणा ही गती मंदावली होती. त्यावेळी लसीकरण झाले नाही. म्हणूनच आता ही रुग्णसंख्या वाढत आहे की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे? म्हणून पाच वर्षाच्या खालील मुलांमध्ये मुख्यत्वे आढळणाऱ्या या गोवरच्या आजारापासून दूर राहण्यासाठी जिल्हा प्रशासन काय करत आहे? या सर्व बाबीचा आढावा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी ईडीटीव्हीच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा केलेला हा प्रयत्न.

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे .तो लसीकरणामुळे टाळता येऊ शकतो. सुमारे पाच वर्षाखालील मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. ताप, खोकला, नाकातून पाणी वाहने, डोळ्यांची जळजळ ,सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल पुरळ येणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत .याच्यापुढे जाऊन वेळीच हा आजार बरा झाले नाही तर मध्यकर्ण संसर्ग, म्हणजेच बहिरेपणा, निमोनिया, अंधत्व, मेंदू संसर्ग, असे. आजार बळावू शकतात.

आजची जालना जिल्ह्याची स्थिती जालना जिल्ह्यामध्ये एकूण संशयित  म्हणून 79 रुग्ण निष्पन्न झाले आहेत.  त्यापैकी चार रुग्णांना गोवरची आणि एका रुग्णाला रूबेलाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गोवरची लागण झालेल्यांमध्ये जालना शहरातील गांधीनगर, लोधी मोहल्ला, जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव उगले आणि जालना तालुक्यातील सामनगाव चा समावेश आहे. रूबेलाची लागण बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील एकाला झाली आहे .दरम्यान या आजाराची लागण झालेल्या वयोगटांमध्ये एक ते सात वर्षांपर्यंत च्या बालकांचा समावेश आहे. या आजारासाठी आवश्यक असलेली लस जिल्हा प्रशासनाकडे मुबलक साठ्यामध्ये उपलब्ध असून आज 12485 लस उपलब्ध आहेत. गोवर हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे ज्या रुग्णाला हा आजार झाला आहे त्याला इतरांपासून अलिप्त ठेवावे आणि जिल्हा प्रशासनाला कळवावे असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले आहे (सविस्तर माहिती ऐकण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.)

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles