Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

बालकांची मोफत हृदयरोग तपासणी आणि उपचार

जालना -येथील सामान्य रुग्णालयामध्ये पुणे येथील बालरोग तज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी बालकांची मोफत तपासणी केली. या तपासणीमध्ये टू डी इको मशीनच्या सहाय्याने बालकांच्या हृदयात असलेल्या आजारांची तपासणी करण्यात आली .यापूर्वी देखील असे अनेक शिबिर पार पडले आहेत.या शिबिरात मुख्यत्वे करून बालकांच्या छातीला असलेले छिद्र आणि त्यावर पुढील उपचार करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. सुगावकर यांनी सांगितले.

दरम्यान आजच्या या शिबिरामध्ये बालकांची तपासणी करून इथे शक्य असलेले उपचार करण्यात आले. तसेच गंभीर उपचार करण्यासाठी पुढील मार्गदर्शनही करण्यात आले आहे.  आज आणि  भविष्यातील उपचार हे सर्व मोफत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या या शिबिरासाठी सध्या एकच टू डी इको तपासणी मशीन आहे आणि लवकरच आणखी दोन मशीन येणार आहेत, त्यापैकी एक सामान्य रुग्णालयासाठी आणि एक घनसावंगी येथील रुग्णालयासाठी देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गायके यांनी दिली आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button