मोबाईल मुळे तिने गमवला जीव;शालेय मित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या;
जालना – तालुक्यातील मानेगाव वाडी तांडा येथे राहणाऱ्या एका शालेय विद्यार्थिनीने तिच्याच मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दिनांक एक डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी या विद्यार्थिनीच्या अल्पवयीन मित्राविरुद्ध मोज मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जालना तालुक्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्यापासून जवळच मानेगाव वाडी तांडा आहे. या तांड्यात विजय विठ्ठल पवार हे एक मुलगी व दोन मुलांसह राहतात. मनीषा नावाची मुलगी ही रामनगर सहकारी साखर कारखाने येथे इंदिरा गांधी विद्यालयात दहावी वर्गात शिक्षण घेत आहे .दरम्यान गावापासून ही शाळा काही अंतरावर असल्यामुळे रोजच जाणे- येणे करावे लागते यादरम्यान मनिषाची गावातीलच एका मुलासोबत ओळख झाली आणि हळूहळू ही मैत्री घट्ट झाली. त्यामुळे यांची जवळीक वाढली. दरम्यान एक डिसेंबरला मनीषा च्या दप्तरामध्ये तिच्या चुलत भावाला मनीषाच्या दप्तरामध्ये एक मोबाईल सापडला ,आणि या मोबाईल विषयी विचारले असता तिने शाळेतील मित्रांनी दिला असल्याचे सांगितले. तेव्हा तिला तिच्या वडिलांनी समजावून सांगितले . आणि मी जालन्याहून परत येताना शिक्षकांना भेटतो असे म्हणून समजूतही काढली त्यानंतर थोडा वेळ हे प्रकरण शांत झाले. वडील इतर कामात गुंतल्यानंतर मुलीने घरातील अँगल ला गळफास घेतला.
दरम्यान या प्रकाराविषयी मनीषा च्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, मनीषाला तिचा मित्र वारंवार फोन करत होता, परंतु मनिषाने ते उचलले नाहीत ,म्हणून त्या मित्राने मनीषाला रामनगर येथील बाजारगल्लीत भेटून तू माझे फोन का उचलत नाहीस? मी अनेक वेळा फोन केले पण प्रतिसाद देत नाहीस आता यापुढे तू जर फोन उचलला नाही किंवा माझ्याशी बोलली नाही तर मी माझ्याकडे असलेले तुझे व्हाट्सअप चॅटिंग व तुझ्या सोबत चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील, तुझी बदनामी करील आणि तुला जिवे मारील अशा धमक्याही दिल्या. तेव्हा या मैत्रिणीने तिची समजूत काढून आपण घरच्यांना सांगून हे प्रकरण व्यवस्थित करू असे समजावलं. हे सर्व झाल्यानंतर मनीषाने आपली बदनामी होईल या भीतीने दिनांक एक डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास या मित्राच्या त्रासाला कंटाळून घरामध्ये अँगल ला दोरी बांधून गळफास घेतला आणि आयुष्य संपविले. तिच्या या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या या अल्पवयीन मित्राच्या विरोधात मोजपुरी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com