मुख्यमंत्र्यांना आव्हान नाही; मात्र राज्यपालांचा निषेध- आ. गोरंट्याल
जालना- मुख्यमंत्र्यांना आव्हान नाही, मात्र राज्यपालांचा जाहीर निषेध आहे ,आणि त्यासाठीच सात तारखेला जालना बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिली.
छत्रपती उदयनराजे भोसले हे रायगडावर आक्रोश करण्यासाठी बसले आहेत, आणि त्यांना पाठिंबा म्हणून जालन्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सत्ताधारी पक्ष सोडून सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि एकूणच राष्ट्रपुरुषांबद्दल सत्ताधारी पक्षाचे नेते वारंवार अपमान जनक भाषा वापरत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी देखील शिवछत्रपतींची तुलना इतरांशी करून त्यांचा अपमानच केला आहे. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवावे अशी मागणीही यावेळी या वेळी करण्यात आली. राष्ट्रपुरुषांच्या अपमानाचा निषेध म्हणून सात तारखेला सर्वपक्षीय जालना बंदचे आवाहन करण्यात आले आहे. उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देण्यासाठी आज आ. कैलास गोरंट्याल, गोरंट्याल, शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, मोतीराम अग्रवाल सहकारी बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, राजेंद्र राख, शेख मेहमूद, कल्याण दळे, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, एडवोकेट नितीन राऊत, श्रीमती शितल तनपुरे ,श्रीमती मनकर्ना डांगे,फकीरा वाघ, आदींची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com